TRENDING:

Astrology: आयुष्यातलं सर्वात श्रेष्ठ दान कोणतं माहितीये? ना पैसा, ना दागिने फक्त...

Last Updated:
गरजू व्यक्तींची मदत करावी, त्यांना आवश्यक वस्तू दान कराव्या, ही शिकवण आपल्याला लहानपणापासून घरातून, शाळेतून मिळते. तिचं पालनही आपण करतो. परंतु सर्वात श्रेष्ठ दान कोणतं आहे माहितीये? (निर्मल कुमार राजपूत, प्रतिनिधी)
advertisement
1/5
Astrology: आयुष्यातलं सर्वश्रेष्ठ दान कोणतं माहितीये? ना पैसा, ना दागिने फक्त...
प्रेमानंद महाराज हे वृंदावनमधील प्रसिद्ध संत आहेत. त्यांचे विचार सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. तरुणांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वजण त्यांच्या विचारांनी प्रेरित होतात. त्यांनी स्वत: सांगितलंय, आपण आयुष्यात कोणतं दान करणं सर्वात श्रेष्ठ आणि लाभदायी ठरतं.
advertisement
2/5
देवाची भक्ती केल्यानं मन:शांती मिळते, मनात सकारात्मकता निर्माण झाल्यानं शरीर ऊर्जावान राहतं. त्यामुळे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आपण सर्व अडचणींवर मात करण्यासाठी तयार राहतो, असं प्रेमानंद महाराज सांगतात. 
advertisement
3/5
देवाच्या भक्तीत जी शक्ती आहे ती कशातच नाही, असंही प्रेमानंद महाराज सांगतात. त्यामुळे आपला दिनक्रम कितीही धावपळीचा असला तरी थोडा वेळ काढून देवाचं नामस्मरण करायलाच हवं. या आयुष्यासाठी देवाचे आभार मानायला हवे.
advertisement
4/5
देवाला आपला श्वास दान करणं, हेच सर्वश्रेष्ठ दान असल्याचं प्रेमानंद महाराज सांगतात. ते म्हणतात, देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी जास्त काही करण्याची आवश्यकता नसते. परंतु आपल्या प्रत्येक श्वासात त्याचं नामस्मरण व्हायला हवं. आपला श्वास देवाच्या नावे केल्यास आयुष्य अत्यंत सुखद होऊ शकतं.
advertisement
5/5
सूचना: इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Astrology: आयुष्यातलं सर्वात श्रेष्ठ दान कोणतं माहितीये? ना पैसा, ना दागिने फक्त...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल