Gemstone: पाच बोटं सारखी नसतात! कोणत्या बोटात कोणतं रत्न शुभफळ देतं? अचूक वेळ पहा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Which Finger to Wear Which Gemstone : मानवी जीवनात उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण ज्योतिषशास्त्रात मिळू शकते. जीवनातील अनेक समस्यांसाठी रत्ने घालण्याचा सल्ला दिला जातो. कोणत्या बोटात कोणते रत्न घालावे, याविषयी जाणून घेऊ. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा आपल्याला या विषयावर सांगत आहेत.
advertisement
1/8

सूर्याचे रत्न: रत्नशास्त्रानुसार, माणिक सूर्याचे रत्न मानले जाते. रविवारी सूर्योदयाच्या वेळी ते अनामिका बोटात धारण करणे शुभ असते. हे रत्न सोन्याच्या धातूमध्ये घालावे.
advertisement
2/8
चंद्राचे रत्न - रत्नशास्त्रानुसार, मोती हे चंद्राचे रत्न मानले जाते. चंद्रोदयाचा काळ हा तो घालण्यासाठी सर्वात शुभ काळ आहे. सर्वात लहान बोटात चांदीच्या घातूमध्ये घातलेला मोती धारण करावा.
advertisement
3/8
मंगळ ग्रहाचे रत्न: रत्नशास्त्रानुसार, प्रवाळ (मूंगा) हे मंगळ ग्रहाचे रत्न मानले जाते. संध्याकाळी अनामिका बोटात तांबे किंवा चांदीच्या धातूत घालून वापरावे.
advertisement
4/8
बुध ग्रहाचे रत्न: रत्नशास्त्रानुसार, हिरवा पन्ना हे बुध ग्रहाचा रत्न मानले जाते. बुधवारी दुपारी १२:०० ते २:०० वाजेपर्यंत ते कधीही घालता येते. सर्वात लहान बोटात पन्ना धारण केला जातो.
advertisement
5/8
गुरू ग्रहाचे रत्न: रत्नशास्त्रानुसार, पुष्कराज हे गुरू ग्रहाचे रत्न आहे. गुरुवारी सकाळी १०:०० ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत सोन्याच्या धातूत ते तर्जनीमध्ये घाला.
advertisement
6/8
शुक्राचे रत्न: रत्नशास्त्रानुसार, हिरा हा शुक्राचा रत्न मानला जातो. हिरा नेहमी सोन्याच्या धातूमध्ये घालायला हवा. शुक्रवारी सकाळी १०:०० ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत तो धारण करावा.
advertisement
7/8
शनिचे रत्न: रत्नशास्त्रानुसार, नीलम हे शनीचे रत्न मानले जाते. शनिवारी ते मधल्या बोटावर धारण करणे शुभ मानले जाते.
advertisement
8/8
राहू-केतूसाठी रत्न: रत्नशास्त्रानुसार, शनिवारी राहू-केतूसाठी मधल्या बोटावर गोमेद धारण करावे. याशिवाय, सुलेमानी हकिक, हकिक, अगाते या नावांनी देखील लोकप्रिय आहेत. हकिक हे अनेक ग्रहांचे उपरत्न आहे. हे राहू-केतू आणि शनि यांचे दुष्परिणाम कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Gemstone: पाच बोटं सारखी नसतात! कोणत्या बोटात कोणतं रत्न शुभफळ देतं? अचूक वेळ पहा