TRENDING:

Asia Cup : प्रॅक्टिस सेशनमधून 6 खेळाडू गायब, टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार मोठे बदल!

Last Updated:
Asia Cup 2025 मध्ये टीम इंडिया शुक्रवारी ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना खेळणार आहे. अबू धाबीच्या शेख झायद स्टेडियममध्ये भारताचा सामना ओमानविरुद्ध (India vs Oman) होणार आहे.
advertisement
1/6
प्रॅक्टिस सेशनमधून 6 खेळाडू गायब, भारताच्या Playing XI मध्ये होणार मोठे बदल!
भारतासाठी ओमानविरुद्धचा हा सामना प्रॅक्टिससारखाच असेल कारण टीमने आधीच सुपर-4 मध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे ओमानची टीम आधीच सुपर-4 च्या रेसमधून बाहेर झाली आहे.
advertisement
2/6
ओमानविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियामध्ये मोठे बदल व्हायचे संकेत मिळत आहेत. कारण मॅचआधी झालेल्या प्रॅक्टिस सेशनमध्ये अनेक खेळाडू उपस्थित नव्हते. या खेळाडूंना टीम इंडिया विश्रांती देणार का? याबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे.
advertisement
3/6
ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्याआधी टीम इंडियाने ऑप्शनल प्रॅक्टिस सेशन आयोजित केला होता, ज्यात टीममधील 9 खेळाडू सहभागी झाले, तर 6 खेळाडू प्रॅक्टिस सेशनपासून लांब राहिले.
advertisement
4/6
जसप्रीत बुमराह, शिवम दुबे, संजू सॅमसन, शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा हे खेळाडू सहभागी झाले नाहीत. गिल आणि अभिषेक शर्मा नेहमी ऑप्शनल प्रॅक्टिस सेशनलाही येतात, पण यावेळी दोघंही आले नाहीत. ऑप्शनल प्रॅक्टिस सेशनमध्ये सहभागी व्हायचा निर्णय हा खेळाडूंचा असतो.
advertisement
5/6
दुसरीकडे ऑप्शनल प्रॅक्टिस सेशनमध्ये फास्ट बॉलर हर्षित राणाने लक्ष वेधून घेतलं. हर्षित राणेने बॉलिंग आणि बॅटिंगमध्येही घाम गाळला, त्यामुळे हर्षित राणाला प्लेयिंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार का? याची उत्सुकता आहे. हर्षित राणाला या स्पर्धेत अजून एकदाही खेळण्याची संधी मिळाली नाही.
advertisement
6/6
प्रॅक्टिस सेशनमध्ये फास्ट बॉलर अर्शदीप सिंगनेही घाम गाळला. अर्शदीप हा भारताचा सगळ्यात यशस्वी टी-20 बॉलर आहे, पण त्यालाही अजून स्पर्धेत एकदाही खेळण्याची संधी मिळाली नाही. ओमानविरुद्ध बुमराहला आराम दिला जाऊ शकतो, त्यामुळे बुमराहऐवजी अर्शदीप सिंग खेळण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Asia Cup : प्रॅक्टिस सेशनमधून 6 खेळाडू गायब, टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार मोठे बदल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल