मुंबई: प्रभादेवी पूलाचे बांधकाम सुरू झाल्याने 12 सप्टेंबरपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे दादर परिसरातील टिळक ब्रिजवर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीपासून बचाव करण्यासाठी वाहतूक विभागाने पर्यायी मार्गांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे बदल आज रात्रीपासून लागू होणार असून ते 17 ऑक्टोबरपर्यंत कायम राहतील. कोणते मार्ग बदलले गेले आहेत आणि नेमकी वाहतूक कशी होणार आहे यासाठी पाहा हा खास व्हिडिओ.