मिळालेल्या माहितीनुसार, झोपडपट्टीमध्ये चार ते पाच घरगुती गॅस सिलिंडरचा एकामागून एक स्फोट झाला, ज्यामुळे काही मिनिटांतच सहा ते सात झोपड्या संपूर्ण जळून खाक झाल्या. त्यामुळे परिसरामध्ये अख्खे धुराचे लोट पाहायला मिळत होते. ज्यामुळे परिसरातील रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. दरम्यान, सुदैवाने, आगीच्या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही, अशी माहिती तेथील अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितली.
advertisement
परिसरामध्ये खूपच दाटवस्ती असल्यामुळे झोपडपट्टीला आग झपाट्याने लागली. आग वेगाने पसरत असल्यामुळे तेथील रहिवाशांनी लगेचच तिथून पळ काढला. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. माहिती मिळताच अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशमन कार्य सुरू केले. सततच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली, ज्यामुळे ती तात्काळ रोखण्यात यश मिळाले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सविस्तर तपास सुरू आहे. अधिकाऱ्यांकडून बाधित कुटुंबांचे किती नुकसान झाले आहे याचाही आढावा घेत आहेत.
