TRENDING:

IPL नंतर वर्ल्डकपची मॅच अडचणीत, बांगलादेशचा सामना मुंबईत होणार का? BCCIसमोर मोठं संकट

Last Updated:
बीसीसीआयने शाहरुख खानच्या कोलकत्ता नाईट रायडर्सने मुस्ताफिजूर रहमानला सोडण्याचा निर्णय घ्यायला लावला होता. बीसीसीआयच्या आणि कोलकत्ता नाईट रायडर्सच्या या निर्णयानंतर तिकडे बांग्लादेश क्रिकेट बोर्ड खूपच आक्रामक झाली आहे.
advertisement
1/8
IPL नंतर वर्ल्डकपची मॅच अडचणीत, बांगलादेशचा सामना मुंबईत होणार का? BCCIसमोर मोठं
बांग्लादेशमध्ये निष्पाप हिंदूंवर सूरू असलेल्या हल्ल्याच्या आणि अत्याचाराच्या घटनेनंतर बांग्लादेशच्या मुस्ताफिजूर रहमानची आयपीएलमधून हकालपट्टी करण्यात आली आहे.
advertisement
2/8
बीसीसीआयने शाहरुख खानच्या कोलकत्ता नाईट रायडर्सने मुस्ताफिजूर रहमानला सोडण्याचा निर्णय घ्यायला लावला होता.
advertisement
3/8
बीसीसीआयच्या आणि कोलकत्ता नाईट रायडर्सच्या या निर्णयानंतर तिकडे बांग्लादेश क्रिकेट बोर्ड खूपच आक्रामक झाली आहे.
advertisement
4/8
बांग्लादेश आता भारत आणि श्रीलंका या दोन देशात संयुक्तपणे आयोजित होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार आहे.
advertisement
5/8
या वर्ल्डकपमध्ये खेळण्याआधी बांग्लादेश क्रिकेट बोर्ड मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. बांग्लादेश बोर्ड आयसीसीकडे जाऊन वर्ल्ड कपचे वेन्यू बदण्याची मागणी करणार असल्याची माहिती आहे.
advertisement
6/8
विशेष म्हणजे बांग्लादेशचे ग्रुप स्टेजमधील सामने मुंबई आणि कोलकत्तामध्ये खेळवले जाणार आहेत. आता जर बांग्लादेशची विनंती आयसीसीने मान्य केली नाही तर सामने नियोजित ठिकाणे खेळवण्यात येतील.
advertisement
7/8
जर असे झाल्यास बांग्लादेश मुंबई आणि कोलकत्तामध्ये सामने खेळतील. पण या मैदानावर सामने खेळवल्यास मोठा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होणार आहे.
advertisement
8/8
त्यामुळे आता सर्व काही आयसीसीच्या हातात आहे. जर बांग्लादेशची विनंती मान्य झाली नाही तर बीसीसीआयसमोर मोठं संकट उभं ठाकणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL नंतर वर्ल्डकपची मॅच अडचणीत, बांगलादेशचा सामना मुंबईत होणार का? BCCIसमोर मोठं संकट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल