TRENDING:

कशी झाली नभाची भेट, IPL स्टार तुषार देशपांडेनं सांगितली Love Story

Last Updated:
IPL स्टार क्रिकेटपटू तुषार देशपांडे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तुषारनं लव्हस्टोरीचं गुपित सांगितलं.
advertisement
1/7
कशी झाली नभाची भेट, IPL स्टार तुषार देशपांडेनं सांगितली Love Story
आयपीएल मधील चेन्नई सुपर किंग्ज टीमधील उगवता तारा म्हणजेच कल्याणमध्ये राहणारा तुषार देशपांडे होय. सर्वसामान्य कुटुंबात मोठा झालेला तुषार आता लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. जून महिन्यात तुषारचा साखरपुडा झाला असून डिसेंबर महिन्यात तो लग्न करत आहे.
advertisement
2/7
विशेष म्हणजे तो ज्या शाळेत शिकला त्या कल्याणमधील के. सी. गांधी शाळेने त्याचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी त्याचे क्रिकेटचे सर्व कोच, वडील उदय देशपांडे आणि त्याची होणारी पत्नी नभा गड्डमवार देखील उपस्थित होती.
advertisement
3/7
एखादे उद्दिष्ट निश्चित करून त्या उद्दिष्टाचा पाठलाग करत त्यासाठी सर्वस्व झोकून देत मेहनत करण्याची तयारी असेल, तर सुविधा असोत वा नसोत तुम्हाला यशापासून कोणीही रोखू शकत नाही, असा यशाचा मंत्र तुषारने नवोदित खेळाडूंना दिला.
advertisement
4/7
कल्याणात खेळाडूसाठी तुलनेने सुविधा कमी आहेत. मात्र रांची सारख्या छोट्या गावातून आलेला एक खेळाडू एम.एस.धोनी कर्णधार पदापर्यंत पोहोचतो आणि तीन तीन आयपीएल ट्रॉफी जिंकू शकतो. म्हणूनच असुविधावर बोलण्यापेक्षा झोकून देऊन खेळणे महत्त्वाचे असल्याचे मत तुषारने मांडले.
advertisement
5/7
मागील तीन वर्षांपासून मी क्रिकेटपटू धोनी बरोबर मैदानात वावरत आहे. मी नेहमीच त्याची जिंकण्याची जिद्द आणि त्यासाठी कोणत्याही स्तरावर मेहनत करण्याची तयारी जवळून पाहत आलो आहे. म्हणूनच धोनी माझा आदर्श असल्याचे तुषार सांगतो.
advertisement
6/7
तुषार 21 डिसेंबर 2023 रोजी आपली बालपणीची मैत्रीण नभा गड्ड्मवार हिच्याशी लग्न बंधनात अडकणार आहे. याबाबत बोलताना त्याने अगदी ज्युनियर केजी पासून नभा आणि मी शाळेत एकत्र शिकत असल्याचं सांगितलं. दहावी नंतर दोघांच्या वाटा बदलल्या. नभा आपल्याला सुरुवाती पासूनच आवडायची. म्हणूनच सोशल मिडियावर तिला पुन्हा एकदा शोधलं आणि अखेर आम्ही एकत्र आल्याचे तुषारने सांगितले.
advertisement
7/7
नभाने फाईन आर्ट मध्ये शिक्षण घेतले असून तिचा स्वतःचा व्यवसाय आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये भल्याभल्यांची विकेट उडवणाऱ्या तुषारची विकेट नभाने घेतली, अशी चर्चा सुरू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
कशी झाली नभाची भेट, IPL स्टार तुषार देशपांडेनं सांगितली Love Story
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल