Vaibhav Suryavanshi : 14 सिक्स ठोकत 171 रन्स करणाऱ्या वैभव सुर्यवंशीला ICC ने दिला धक्का!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Vaibhav Suryavanshi U19 Asia Cup : टीम इंडियाचा युवा स्टार वैभव सुर्यवंशी याने अंडर 19 आशिया कपमध्ये दीडशतक ठोकून अफलातून कामगिरी केली आहे. मात्र, आयसीसीने त्याला धक्का दिलाय.
advertisement
1/7

वैभवने पहिल्या मॅचमध्ये खेळताना 95 बॉलमध्ये 180 च्या स्ट्राइक रेटने 171 रनची अविश्वसनीय इनिंग खेळली. त्याने आपल्या या खेळीदरम्यान 9 फोर आणि 14 सिक्स मारले. 30 बॉलवर फिफ्टी पूर्ण केल्यानंतर, त्याने 56 बॉलवर शतक ठोकलं अन् सर्वांना चकित केलं.
advertisement
2/7
तसेच, 84 बॉल खेळल्यानंतर 7 फोर आणि 13 सिक्सच्या मदतीने त्याने 150 रनचा आकडा गाठला. ही इनिंग रेकॉर्ड तोडणारी होती, पण तरीही ती रेकॉर्ड बुकमध्ये समाविष्ट केली गेली नाही.
advertisement
3/7
युथ वनडे क्रिकेटमध्ये हे तिसरे सर्वात जलद शतक आणि कोणत्याही भारतीयाने केलेला दुसरा सर्वात मोठा वैयक्तिक स्कोर ठरला असता. त्याने मारलेले 14 सिक्स देखील एक विश्व रेकॉर्ड बनू शकले असते. पण, या मॅचला अधिकृत युथ वनडेचा दर्जा न मिळाल्याने ही इनिंग रेकॉर्ड बुक मध्ये नोंदवली जाणार नाही.
advertisement
4/7
याचं कारण असं आहे की यूएई ही असोसिएट टीम आहे. अंडर-19 एशिया कपमध्ये अधिकृत युथ वनडेचा दर्जा फक्त त्याच मॅचेसला मिळतो, जे दोन टेस्ट खेळणाऱ्या देशांदरम्यान होतात, जसं की रविवार रोजी भारत-पाकिस्तानमध्ये होणारा मॅच...
advertisement
5/7
फक्त अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये असोसिएट देशांच्या टीम्सच्या मॅचेसला युथ वनडेचा दर्जा मिळतो. याच कारणामुळे पुढील महिन्यात बुलावायो येथे भारत आणि अमेरिकेदरम्यान होणारा मॅच अधिकृत युथ वनडे असेल, परंतु मंगळवार रोजी मलेशियाविरुद्ध होणारा मॅच अनधिकृत असेल.
advertisement
6/7
वैभवच्या नावावर आधीच एक युथ वनडे शतक जमा आहे, जे त्याने याच वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंड अंडर-19 विरुद्ध वूस्टरमध्ये 52 बॉलमध्ये ठोकलं होतं. अशातच आयसीसीने वैभव सूर्यवंशीला धक्का दिला आहे.
advertisement
7/7
याव्यतिरिक्त, या युवा बॅट्समनच्या नावावर 50 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये जूनियर भारतीय टीमसाठी तीन अर्धशतके आणि युथ टेस्ट क्रिकेटमध्ये दोन शतके व एक अर्धशतक देखील आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi : 14 सिक्स ठोकत 171 रन्स करणाऱ्या वैभव सुर्यवंशीला ICC ने दिला धक्का!