तिरुपती- पंढरपूर साप्ताहिक विशेष गाडी
तिरुपती- पंढरपूर साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक 07012 ही 20 डिसेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत दर शनिवारी सायंकाळी 04 वाजून 40 मिनिटाला तिरुपती येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 06 वाजून 50 मिनिटाला पंढरपूरला पोहोचेल. तर या गाडीला रेणिगुंटा, राजमपेटा, ओंटिमिट्टा, कडपा, येरगुंटला, ताडिपत्रि, गूटी, डोन, कर्नूलु सिटी, गदवाल, वनपर्ती रोड, महबूबनगर, जडचर्ला, शादनगर, उमदानगर, काचीगुडा, सिकंदराबाद, बेगमपेट, लिंगमपल्ली, शंकरपल्ली, विकाराबाद, जहीराबाद, बीदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्शी टाऊन, कुर्डूवाडी, मोडनिंब या रेल्वे स्थानकावर थांबा मिळणार आहे.
advertisement
नाशिकवरून होतोय सुपर हायवे! अक्कलकोट 4 तासांत, तिरुपती 12 तासांत, पाहा कसा असेल मार्ग?
पंढरपूर - तिरुपती विशेष गाडी
पंढरपूर तिरुपती विशेष गाडी क्रमांक 07032 ही 21 डिसेंबर 2025 ते 28 डिसेंबर 2025 पर्यंत दर रविवारी पंढरपूरहून रात्री 8 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 10:30 मिनिटाला तिरुपतीला पोहोचेल. तर या पंढरपूर तिरुपती विशेष रेल्वे गाडीला मोडनिंब, कुर्डूवाडी, बार्शी टाऊन, धाराशिव, लातूर, लातूर रोड, उदगीर, भालकी, बीदर, जहीराबाद, विकाराबाद, शंकरपल्ली, लिंगमपल्ली, बेगमपेट, सिकंदराबाद, चर्लपल्ली, नल्लगोंडा, मिर्यालगुडा, नडीकुडी, सर्त्तनपल्ली, गुंटूर, तेनाली, बापटल्ला, ओंगोल, नेल्लुर, गुडुर, श्री कालहस्ती, रेणिगुंटा या ठिकाणी थांबा मिळणार आहे.
दरम्यान, प्रवाशांनी गाड्यांचा तपशील पाहून वैध तिकिटासह प्रवास करून प्रवासाचा आनंद घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






