पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं अन् बालाजीला जायचं, पंढरपूर-तिरुपती विशेष रेल्वे, पाहा वेळापत्रक

Last Updated:

Pandharpur-Tirupati Railway: पंढरपूरहून तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे तिरुपती-पंढरपूर दरम्यान सात्पाहिक विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहे.

Pandharpur Tirupati Railway: पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं अन् बालाजीला जायचं, पंढरपूर-तिरुपती विशेष रेल्वे, पाहा वेळापत्रक
Pandharpur Tirupati Railway: पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं अन् बालाजीला जायचं, पंढरपूर-तिरुपती विशेष रेल्वे, पाहा वेळापत्रक
सोलापूर – पंढरपूर आणि तिरुपतीच्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन थेट तिरुपतीच्या बालाजी दर्शनला जाता येणार आहे. भाविकांच्या मागणीनुसार मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. पंढरपूर ते तिरुपती थेट साप्ताहिक विशेष रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ही सेवा सुरू करण्यात आली असून भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तिरुपती- पंढरपूर साप्ताहिक विशेष गाडी
तिरुपती- पंढरपूर साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक 07012 ही 20 डिसेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत दर शनिवारी सायंकाळी 04 वाजून 40 मिनिटाला तिरुपती येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 06 वाजून 50 मिनिटाला पंढरपूरला पोहोचेल. तर या गाडीला रेणिगुंटा, राजमपेटा, ओंटिमिट्टा, कडपा, येरगुंटला, ताडिपत्रि, गूटी, डोन, कर्नूलु सिटी, गदवाल, वनपर्ती रोड, महबूबनगर, जडचर्ला, शादनगर, उमदानगर, काचीगुडा, सिकंदराबाद, बेगमपेट, लिंगमपल्ली, शंकरपल्ली, विकाराबाद, जहीराबाद, बीदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्शी टाऊन, कुर्डूवाडी, मोडनिंब या रेल्वे स्थानकावर थांबा मिळणार आहे.
advertisement
पंढरपूर - तिरुपती विशेष गाडी
पंढरपूर तिरुपती विशेष गाडी क्रमांक 07032 ही 21 डिसेंबर 2025 ते 28 डिसेंबर 2025 पर्यंत दर रविवारी पंढरपूरहून रात्री 8 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 10:30 मिनिटाला तिरुपतीला पोहोचेल. तर या पंढरपूर तिरुपती विशेष रेल्वे गाडीला मोडनिंब, कुर्डूवाडी, बार्शी टाऊन, धाराशिव, लातूर, लातूर रोड, उदगीर, भालकी, बीदर, जहीराबाद, विकाराबाद, शंकरपल्ली, लिंगमपल्ली, बेगमपेट, सिकंदराबाद, चर्लपल्ली, नल्लगोंडा, मिर्यालगुडा, नडीकुडी, सर्त्तनपल्ली, गुंटूर, तेनाली, बापटल्ला, ओंगोल, नेल्लुर, गुडुर, श्री कालहस्ती, रेणिगुंटा या ठिकाणी थांबा मिळणार आहे.
advertisement
दरम्यान, प्रवाशांनी गाड्यांचा तपशील पाहून वैध तिकिटासह प्रवास करून प्रवासाचा आनंद घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं अन् बालाजीला जायचं, पंढरपूर-तिरुपती विशेष रेल्वे, पाहा वेळापत्रक
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement