IND vs ENG सामन्याआधी इंग्लंडच्या दिग्गजाचा झोंबणार ट्विट,140 कोटी भारतीयांच्या तळपायाची आग मस्तकात,नेमकं काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
उद्या वानखेडेच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा सेमीफायनल खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकणारा संघ फायनलला जाणार आहे.
advertisement
1/8

टी20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने साऊथ आफ्रिकेचा 9 विकेट राखून पराभव केला आहे.या विजयासह न्यूझीलंड सेमी फायनलला पोहोचली आहे.
advertisement
2/8
न्यूझीलंडकडून फिन एलेनने 33 बॉलमध्ये 100 धावांनी नाबाद शतकीय खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने 8 षटकार आणि 10 चौकार लगावले होते. एलनसोबत टीम सिफर्टने 58 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. या खेळीच्या बळावर न्यूझीलंडने 12.5 ओव्हरमध्ये हे लक्ष्य गाठत सामना जिंकला आहे.
advertisement
3/8
दरम्यान मार्का यान्सनने 30 बॉलमध्ये 55 धावांची नाबाद खेळी केली होती. या वादळी खेळीमुळे साऊथ आफ्रिकेने 169 धावा ठोकल्या होत्या.त्यामुळे न्यूझीलंडसमोर 170 धावांचे लक्ष्य आहे.
advertisement
4/8
न्यूझीलंड हा सामना जिंकल्याने आता थेट टी20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. आता त्यांचा सामना हा रविवारी 8 मार्चला भारत किंवा इंग्लंड या दोन संघापैकी दुसरी फायनल जिंकणाऱ्या संघासोबत होणार आहे.
advertisement
5/8
उद्या वानखेडेच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा सेमीफायनल खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकणारा संघ फायनलला जाणार आहे.
advertisement
6/8
पण भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या सेमी फायनलआधी इंग्लंडचा दिग्गज स्टार क्रिकेटपटू केवीन पीटरसनने भारताला डिवचलं आहे.त्यामुळे भारतीय फॅन्स प्रचंड चिडले आहेत.
advertisement
7/8
केवीन पीटरसनने एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने न्य़ूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात वर्ल्ड कप फायनलची लढत होईल असे भाकीत वर्तवणार ट्वीट केलं आहे. याचा अर्थ उद्या भारत इंग्लंड विरूद्ध हारेल असे केविन पीटरसनला म्हणायचं आहे.
advertisement
8/8
पण उद्याच्या सामन्याचा निकाल काय लागायचा तो लागेल.पण मॅच आधी केविन पीटरसनने केलेल ट्वीटमुळे भारतीय चाहत्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs ENG सामन्याआधी इंग्लंडच्या दिग्गजाचा झोंबणार ट्विट,140 कोटी भारतीयांच्या तळपायाची आग मस्तकात,नेमकं काय घडलं?