IND vs NZ 1st T20 : सूर्या एकच नाव सांगून पळाला, टीम इंडियामध्ये दुसर्या स्टार खेळाडूची होणार एन्ट्री! कशी असेल प्लेइंग इलेव्हन?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IND vs NZ 1st T20i Playing XI : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध दोन हात करणार आहे. पाच सामन्यांची ही मालिका भारतीय संघासाठी लिटमस टेस्ट असेल. अशातच आता प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण? असा सवाल विचारला जातोय.
advertisement
1/5

न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर पहिली एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर आता सूर्यकुमार यादवची सेना किवींना भिडणार आहे. बुधवारपासून नागपूरमध्ये सुरू होणारी पाच सामन्यांची मालिका भारतीय संघासाठी स्वतःला सिद्ध करण्याची एक मोठी संधी असेल.
advertisement
2/5
सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली होती. टीम इंडियामध्ये नंबर तीनवर ईशान किशनला संधी दिली जाईल, असं सूर्यकुमारने जाहीर केलं होतं. त्यामुळे आता श्रेयस अय्यर याला टीममध्ये संधी मिळणार नाही.
advertisement
3/5
अशातच आता सूर्याने सांगितलं नाही पण प्लेईग इलेव्हनमध्ये आणखी एका खेळाडूची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून रवी बिश्नोई आहे. तो गेल्या 11 महिन्यांपासून टीममधून बाहेर आहे.
advertisement
4/5
रवी बिश्नोई हा वरुण चक्रवर्तीच्या जागेवर खेळेल, अशी शक्यता आहे. तर दोन्ही पेसर ऑलराऊंडर पांड्या आणि दुबे देखील संघात खेळतील. तसेच अक्षर पटेल बिश्नोईला साथ देईल, अशी शक्यता आहे.
advertisement
5/5
टीम इंडियाची संभावित प्लेइंग इलेव्हन - संजू सॅमसन (WK), अभिषेक शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, शिवम दुबे, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, रवी बिश्नोई.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ 1st T20 : सूर्या एकच नाव सांगून पळाला, टीम इंडियामध्ये दुसर्या स्टार खेळाडूची होणार एन्ट्री! कशी असेल प्लेइंग इलेव्हन?