IVF मध्ये शरीराबाहेर लॅबमध्ये अंडाणू आणि शुक्राणू एकत्र करून गर्भ तयार केला जातो आणि तो गर्भाशयात ट्रान्सफर केला जातो. सामान्य गर्भधारणा फॅलोपियन ट्यूब्समध्ये होते, पण IVF मध्ये हे सर्व प्रयोगशाळेतच होतं. त्यामुळे या प्रक्रियेला टेस्ट-ट्यूब बेबी म्हणतात कारण गर्भ तयार होणं शरीराबाहेर होतं. आयव्हीएफचा खर्च हा शहर, सेंटर्स, प्रक्रिया, इंजेक्शन, औषधं, वय अशा वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतो.
advertisement
आयव्हीएफचे हिडन कॉस्ट
पुण्यातील आयव्हीएफ एक्सपर्ट डॉ. सुप्रिया पुराणिक यांनी सांगितलं की, अनेक आयव्हीएफ सेंटर्समध्ये हिडन कॉस्ट असतात ज्याबाबत आपल्याला माहिती नसेत इंजेक्शनचे दर सांगितले जातात किंवा काही वेळा इंजेक्शन्स आपल्या पॅकेजमध्ये असतात. पण इंजेक्शनसोबत जी औषधं, ब्लड टेस्ट किंवा स्क्रेचिंग, पीआरपीसारख्या छोट्या छोट्या प्रक्रिया होतात त्यामुळे आयव्हीएफचा खर्च वाढतो हे सगळं लक्षात घेऊनच आर्थिक तरतूद करावी.
डॉ. अनिरुद्ध मालपानी यांनी सांगितलं, बहुतेक सेंटर्समध्ये असं होतं की आयव्हीएफ सायकलचा खर्च 25000 आहे असं सांगतात. त्यामुळे रुग्ण आपल्याला परवडणारी आहे असं मानतो. पण जेव्हा खरी ट्रिटमेंट सुरू होते तेव्हा हा खर्च वाढतो आणि डॉक्टर सांगतात की आयव्हीएफ सायकलचे फक्त 25000 आहेत, पण तुम्हाला इंजेक्शन, औषधं, स्कॅन, ब्लड टेस्ट इत्यादींसाठी अतिरिक्त खर्च द्यावा लागेल असं सांगतात. म्हणजे आपण ज्या खर्चासाठी तयार असतो त्यापेक्षा कित्येक पटीने खर्च वाढतो. आता अशावेळी करायचं काय तर डॉक्टरांकडून तपशीलवार खर्च मागा. म्हणजे औषधं, स्कॅन, टेस्ट वगैरे इत्यादी. यातही तुम्हाला इंजेक्शन, डोस किती लागतील यानुसार खर्च वाढू शकतो, पण एक आयडिया तुम्हाला मिळेल.
तरी अंदाजे खर्च किती?
आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. चिन्मय पत्की यांनी सांगितलं की आयव्हीएफचा खर्च इतका आहे की कोणतीही इन्शुरन्स कंपनी किंवा सरकारी पॉलिसी तो कव्हर करू शकत नाही. त्यामुळे रुग्णालाच हा खर्च उचलावा लागतो. मध्यमवर्गीयांना हा खर्च परवडणारा नाही. चांगल्या आयव्हीएफ सेंटरमध्ये उपचार घेतले तर सगळा खर्च दीड ते दोन लाखांपर्यंत असू शकतो. मधील 50000 जो गॅप आहे तो रुग्णाला कोणते इंजेक्शन लागणार आहे, किती डोस लागणार आहेत, लॅबमध्ये काही अतिरिक्त प्रक्रिया लागणार आहेत का? अशा वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून आहे.
अनेकदा एक IVF सायकलमध्ये गर्भधारणेची खात्री नसते, त्यामुळे 2-3 सायकल लागण्याची शक्यता असते. म्हणजे एकूण खर्च वाढू शकतो. यशाचे टक्के दर वय, कारणे आणि क्लिनिकच्या गुणवत्ता यानुसार बदलतात.
