या महामार्गामुळे शहरातून जाणारी सोलापूर–धुळे जोडणी अधिक सुलभ होणार आहे. मराठवाड्यातून खान्देशाकडे जाण्यासाठी लागणारी कसरत कमी होत उद्योग, व्यापार आणि दळणवळणाला नवी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
अडीच तासांचा प्रवास 60 मिनिटांत, छ. संभाजीनगरात होतोय रिंग रोड, गेमचेंजर प्लॅन कसा?
हा मार्ग गौताळा–औट्रम घाट वन्यजीव अभयारण्य परिसरातून जात असल्याने परवानग्यांअभावी काम रखडले होते. पावसाळ्यात दरडी कोसळणे व अपघातांच्या घटनांनीही प्रवाशांची चिंता वाढवली होती. केंद्र व राज्यस्तरावर समन्वय साधत विशेष बैठका घेण्यात आल्या. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्तक्षेपानंतर प्रलंबित बाबींना मार्ग निघाला आणि पर्यावरणीय मंजुरीमुळे कामाला गती मिळाली.
advertisement
तांत्रिक वैशिष्ट्ये
सुमारे 5.5 किमी लांबीचा दुहेरी बोगदा असेल. ये-जा वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग असेल. ताशी 100 किमी वेगासाठी रचना आहे. आपत्कालीन मार्ग, फायर-फायटिंग आणि सुरक्षा यंत्रणा असेल.
इको-सेन्सिटिव्ह नियमांचे पालन; वृक्षतोड टाळण्यासाठी डोंगराखालून बोगदा तयार करण्यात येईल.
खर्च व प्रगती
अंदाजे खर्च: 12434 ते 12600 कोटी यासाठी लागेल.
अलाईनमेंट मंजूर; केंद्र–राज्य समन्वयातून काम युद्धपातळीवर काम चालू आहे. मालवाहतूक जलद; घाटातील वाहतूक कोंडी संपुष्टात येईल.
सध्याच्या अडचणी काय आहेत?
अरुंद रस्ता, तीव्र उतार व 28 हून अधिक धोकादायक वळणे आहेत. दरड कोसळण्याचा धोका आहे. अवजड वाहनांमुळे सातत्याने कोंडी व अपघात होण्याची शक्यता आहे.
बोगदा पूर्ण झाल्यानंतरचा परिणाम
प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात घट होईल. इंधन बचत व वाहनांची कमी झीज होईल. अपघातांचा धोका कमी होईल. मराठवाडा–खान्देश अर्थव्यवस्थेला गती मिळेल.
नव्या मार्गाची जोडणी
उत्तर बाजू: चाळीसगाव तालुका (बोधरे परिसर)
दक्षिण बाजू: कन्नड तालुका (तलवाडा फाटा)
कन्नड शहरातील अवजड वाहतूक शहराबाहेर वळवणे शक्य होईल.
हा प्रकल्प केवळ रस्त्याचा नाही, तर उत्तर–दक्षिण वाहतुकीला सुरक्षित, वेगवान आणि पर्यावरणपूरक दिशा देणारा मराठवाडा–खान्देश विकासाचा कणा ठरणार आहे.






