IND vs NZ : हेड परवडला पण हा नको,7 इनिंग्समध्ये 659 धावा, न्यूझीलंडचा एकटाच टीम इंडियाला घाम फोडतोय
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
इंदुरच्या होळकर स्टेडिअम सुरू असलेल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडच्या टीमने टीम इंडियाची अक्षरस धुलाई केली आहे. त्यामुळे आता टीम इंडियासमोर डोंगरा एवढ आव्हान आहे.
advertisement
1/7

इंदुरच्या होळकर स्टेडिअम सुरू असलेल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडच्या टीमने टीम इंडियाची अक्षरस धुलाई केली आहे. त्यामुळे आता टीम इंडियासमोर डोंगरा एवढ आव्हान आहे.
advertisement
2/7
खरं तर सामन्याच्या पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवर अर्शदिप सिंहने हेन्री निकोलीसला शुन्यावर बाद केले होते. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये हर्षित राणाने डेवॉन कॉन्वेला बाद करून दोन्ही समालीमीवर माघारी धाडले होते. अशाप्रकारे टीम इंडियाची सूरूवात चांगली झाली होती.
advertisement
3/7
रविंद्र जडेजाने त्यानंतर विल यंगला 30 धावांवर कॅच आऊट केले होते. त्यानंतर डेरी मिचेल आणि ग्लेन फिलिप्सची ही जोडी मैदानात आली होती.
advertisement
4/7
या दोन्ही खेळाडूंनी टीम इंडियाला प्रचंड रडवलं होत. कारण टीम इंडियाविरूद्ध नेहमी धावा करणारा डेरी मिचेल 137 धावांची शतकीय खेळी करून बाद झाला. या खेळीत त्याने 3 षटकार आणि 15 चौकार लगावले.
advertisement
5/7
डेरी मिचेलसोबत ग्लेन फिलिप्सने 106 धावांची शतकीय खेळी केली. या खेळी दरम्यान 3 षटकार आणि 9 चौकार मारले होते. या दोन्ही खेळाडूंच्या शतकीय खेळीच्या बळावर न्यूझीलंडने 8 विकेट गमावून 337 च्या पार धावा केल्या आहेत.
advertisement
6/7
डेरी मिचेलने भारताविरुद्ध नेहमीच धावा केल्या आहेत. भारताविरूद्ध मागच्या 7 सामन्यातील धावा पाहिल्या तर एकट्याने मिचेलने 659 धावा केल्या आहेत. त्यात त्याने चार शतक झळकावली आहे. मिचेल सारखा ऑस्ट्रेलियाचा ट्रेविस हेड देखील भारताविरूद्ध धावा काढतो. पण आता टीम इंडियावर आता हेड परवडला पण हा नको,असे बोलायची वेळ आली आहे.
advertisement
7/7
टीम इंडियाकडून यावेळी अर्शदिप सिंह आणि हर्षित राणाने 3 विकेट काढल्या आहेत. आणि मोहम्मद सिराजने आणि कुलदीप यादवने एक विकेट काढली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : हेड परवडला पण हा नको,7 इनिंग्समध्ये 659 धावा, न्यूझीलंडचा एकटाच टीम इंडियाला घाम फोडतोय