IND vs NZ : गंभीरने स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारली, तीन निर्णयामुळे मालिका गमावली, जगभर नाचक्की झाली
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
इंदूरच्या होळकर स्टेडिअमवर शेवटच्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाचा 41 धावांनी पराभव केला होता. या विजयासह न्यूझीलंडने 3 सामन्यांची वनडे मालिका 2-1 ने खिशात घातली.
advertisement
1/7

इंदूरच्या होळकर स्टेडिअमवर शेवटच्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाचा 41 धावांनी पराभव केला होता. या विजयासह न्यूझीलंडने 3 सामन्यांची वनडे मालिका 2-1 ने खिशात घातली.
advertisement
2/7
न्यूझीलंडने नुसती ही वनडे मालिका जिंकली नाही, भारत भूमिवरचा 37 वर्षांचा रेकॉर्डही मोडला होता. इतक्या वर्षात न्यूझीलंडला एकदाही वनडे मालिका जिंकता आली नव्हती, ती काल त्यांनी जिंकून दाखवली होती.
advertisement
3/7
टीम इंडियाच्या या लाजिरवाण्या पराभवाला गौतम गंभीरचे काही निर्णय कारणीभूत ठरले आहेत. हे निर्णय नेमके काय आहेत? हे जाणून घेऊयात.
advertisement
4/7
पहिले कारण न्यूझीलंड विरूद्ध रवींद्र जडेजाला ऑलराऊंडर म्हणून संघात खेळवलं होतं. मात्र या सामन्यात त्याला फक्त 4,27 आणि 12च धावा केल्या होत्या.विशेष म्हणजे रविंद्र जडेजा फलंदाजीत तर फ्लॉप ठरलाच त्याचसोबत त्याला गोलंदाजीतही फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. विशेष म्हणजे रविंद्र जडेजा सारखाच अक्षऱ पटेलच्या रूपात रिप्लेसमेंट आहे,तो टी20 चा उप कर्णधार देखील आहे. अशापरिस्थितीता त्याला वनडे फॉरमॅटमध्ये न खेळवणे हे समजण्यापलिकडे आहे.
advertisement
5/7
दुसरं कारण नितीश कुमार रेड्डी या सामन्यात ऑलराऊंडर खेळतो आहे. पण गोलंदाजीत नितीशची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही आहे. अशा परिस्थितीत तुमच्याकडे हार्दिक पांड्याच्या रूपात एक चांगला खेळाडू असताना त्याला बाहेर बसवण्याचं कारण समजत नाही.
advertisement
6/7
नितीश रेड्डीच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर त्याला पहिल्या दोन सामन्यात फलंदाजीची संधीच मिळाली नाही.शेवटच्या सामन्यात त्याला जी संधी मिळाली,त्यात त्याने अर्धशतक ठोकून स्वत:ला सिद्ध केलं.
advertisement
7/7
तिसरं कारण वरूण चक्रवर्ती आणि अर्शदिप सिंह हे दोन्ही खेळाडू खूप चांगली गोलंदाजी करतात. पण गौतम गंभीरला हे दोन्ही खेळाडू वनडे फॉरमॅट खेळ शतक नाही असे वाटते. तसेच प्रत्येकवेळी एखादा गोलंदाज निवडताना त्याची फलंदाजी का तपासली जाते? मोहम्मद सिराज आणि बुमराह या दौघांपैकी एकाला संघात सामील केले गेले पाहिजे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : गंभीरने स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारली, तीन निर्णयामुळे मालिका गमावली, जगभर नाचक्की झाली