TRENDING:

Munmun Dutta Marriage : वयाच्या 38 व्या वर्षी लग्न करणार तारक मेहताची बबीता जी, शोधलाय विदेशी नवरा?

Last Updated:
advertisement
1/8
वयाच्या 38 व्या वर्षी लग्न करणार तारक मेहताची बबीता जी, शोधलाय विदेशी नवरा?
हिंदी टेलिव्हिजनचा ऑल टाइम फेव्हरेट शो म्हणजे तारक मेहता का उल्टा चश्मा. या शोमधील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. असंच एक पात्र म्हणजे बबीता जी. खऱ्या आयुष्यात मात्र बबीता जी म्हणजे अभिनेत्री मुनमुन दत्ता सिंगल आहे. मुनमुन दत्ता लग्न कधी करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. 
advertisement
2/8
मुनमुन दत्ताने तिच्या लग्नाविषयी महत्त्वाची अपडेट दिली आहे. वयाच्या 38 व्या मुनमुन दत्ता लग्न करणार आहे. लग्नासाठी तिने विदेशी मुलगा शोधला आहे. नेमकं काय म्हणाली मुनमुन दत्ता? 
advertisement
3/8
मालिकेत बबीता जीची भूमिकेसाठी फेमस असलेली मुनमुन दत्ता लवकरच बोहल्यावर चढणार हे ऐकून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. तिनं स्वतःच लग्नाबाबतची मौन सोडलं आहे.
advertisement
4/8
एका पॉडकास्टमध्ये मुनमुन दत्तानं प्रेम, ब्रेकअप आणि लग्न या विषयांवर मोकळेपणानं भाष्य केलं. मुनमुन म्हणाली, "मी लग्न करणार की नाही याबाबत माझा अजूनही ठाम निर्णय नाही. जर माझ्या नशिबात लग्न असेल तर ते होईलच. पण मी लग्नासाठी धावपळ करणारी मुलगी नाही". 
advertisement
5/8
ती पुढे म्हणाली, "माझा नवरा असा-तसा असायलाच हवा असं माझं कधीही स्वप्न नव्हतं. मी कधीच अशा कल्पनांमध्ये अडकले नाही."
advertisement
6/8
"मला गुड लुकिंग, चांगलं कम्युनिकेशन स्किल असलेले, समजूतदार आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम पुरुष आवडतात. मी खोटं बोलत नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात," असं ती म्हणाली.
advertisement
7/8
मुनमुननं परदेशी पुरुषांबद्दलही भाष्य केलं. ती म्हणाली, "आजकाल मला कोरियन कलाकार खूप आवडतात. परदेशी लोकांची बॉन्डिंग चांगली असते. ते वेगवेगळ्या ठिकाणी जन्मलेले आणि वेगवेगळ्या संस्कृतीत वाढलेले असल्यामुळे त्यांची विचारसरणी अधिक विकसित असते. ते महिलांशी आदरानं आणि प्रेमानं वागतात". यावरून मुनमुन तिच्यासाठी परदेशी मुलगा शोधतेय का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. 
advertisement
8/8
मुनमुन दत्ता सध्या 38 वर्षांची आहे.  2004 साली तिनं अभिनयाला सुरुवात केली. 'हम सब बाराती' मधून एन्ट्री केली. पण मुनमुनला खरी ओळख ही 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या शोमुळे मिळाली. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Munmun Dutta Marriage : वयाच्या 38 व्या वर्षी लग्न करणार तारक मेहताची बबीता जी, शोधलाय विदेशी नवरा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल