TRENDING:

IND vs NZ : ...तर वनडेसारखीच हालत होणार, न्यूझीलंडच्या 3 खेळाडूंकडून टीम इंडियाला खतरा!

Last Updated:
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजला बुधवारपासून सुरूवात होणार आहे. पहिला सामना नागपूरच्या जामठा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
advertisement
1/6
...तर वनडेसारखीच हालत होणार, न्यूझीलंडच्या 3 खेळाडूंकडून टीम इंडियाला खतरा!
टी-20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाची ही शेवटची सीरिज आहे, त्यामुळे या सीरिजकडे वर्ल्ड कपची शेवटची तयारी म्हणून पाहिलं जात आहे, पण न्यूझीलंडच्या टीमला अजिबात हलक्यात घेऊन चालणार नाही.
advertisement
2/6
नुकत्याच संपलेल्या वनडे सीरिजमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभवाचा धक्का दिला आहे. पहिली वनडे जिंकल्यानंतरही भारतीय टीमला पुढच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. न्यूझीलंडने पहिल्यांदाच भारतात वनडे सीरिज जिंकली.
advertisement
3/6
वनडेनंतर आता टी-20 सीरिजमध्येही न्यूझीलंडच्या टीममध्ये एकहाती मॅच फिरवणारे खेळाडू आहेत, ज्यांच्यापासून टीम इंडियाला सावध राहावं लागणार आहे. अन्यथा टी-20 सीरिजचा निकालही वनडे सीरिजसारखाच लागेल.
advertisement
4/6
न्यूझीलंडचा स्टार ऑलराऊंडर ग्लेन फिलिप्स हा फक्त बॅटिंग आणि बॉलिंगच नाही, तर त्याच्या फिल्डिंगनेही मॅचचा निकाल फिरवू शकतो. वनडे सीरिजमध्ये फिलिप्सने शेवटच्या सामन्यात खणखणीत शतक ठोकलं, तर दुसऱ्या सामन्यात नाबाद 32 रनची खेळी करून किवी टीमला विजय मिळवून दिला.
advertisement
5/6
न्यूझीलंडचा अनुभवी खेळाडू डॅरेल मिचेल हा मागच्या काही काळापासून टीम इंडियाला त्रास देत आहे. वनडे सीरिजमध्येही त्याने 3 पैकी 2 सामन्यांमध्ये शतक ठोकलं आणि एक अर्धशतकही केलं, त्यामुळे त्याला प्लेअर ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं. पहिल्या टी-20 सामन्यात मिचेल पुन्हा एकदा टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकतो.
advertisement
6/6
न्यूझीलंडचा फास्ट बॉलर काईल जेमिसनही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. वनडे सीरिजमध्ये जेमिसनने एकूण 6 विकेट घेतल्या. सीरिजमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलरमध्ये जेमिसन दुसऱ्या क्रमांकावर होता, त्यामुळे टी-20 सीरिजमध्ये भारतीय खेळाडूंना जेमिसनसमोर सांभाळून बॅटिंग करावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : ...तर वनडेसारखीच हालत होणार, न्यूझीलंडच्या 3 खेळाडूंकडून टीम इंडियाला खतरा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल