Jasprit Bumrah : धर्मशालामधून निघाला, तडकाफडकी मुंबईत आला, बुमराहने अचानक का सोडली टीम इंडियाची साथ?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडिया दोन बदलांसह मैदानात उतरली. जसप्रीत बुमराह खेळत नसल्याचं समजताच अनेकांना धक्का बसला.
advertisement
1/6

धर्मशालामधल्या या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर प्लेइंग इलेव्हनची माहिती देताना सूर्यकुमार यादवने बुमराह आणि अक्षर पटेल खेळत नसल्याचं सांगितलं, त्यामुळे अनेकांना धक्का बसला.
advertisement
2/6
अक्षर पटेल आजारी असल्यामुळे खेळत नसल्याचं सूर्याने सांगितलं, तर बुमराह वैयक्तिक कारणामुळे उपलब्ध नसल्याचं सूर्यकुमार यादव म्हणाला. सूर्यकुमार यादवच्या या वक्तव्यानंतर बीसीसीआयनेही बुमराहबद्दल अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
3/6
जसप्रीत बुमराह हा टीम इंडियासोबत धर्मशालाला गेला होता, पण अचानक त्याने टीमची साथ सोडली आणि तो मुंबईमध्ये त्याच्या घरी आल्याची माहिती समोर आली आहे. वैयक्तिक कारणामुळे बुमराह घरी गेल्याचं सूर्यकुमार यादवने सांगितलं आहे.
advertisement
4/6
बुमराह सीरिजच्या उरलेल्या सामन्यांसाठी उपलब्ध असणार का नाही? याबाबत बीसीसीआयने प्रतिक्रिया दिली आहे. बुमराह वैयक्तिक कारणामुळे घरी गेला असून या सामन्यात तो खेळणार नाही. सीरिजच्या पुढच्या सामन्यांमध्ये तो खेळेलका नाही? याबाबतची माहिती योग्य वेळी दिली जाईल, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.
advertisement
5/6
फेब्रुवारी-मार्च महिन्यात भारतात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे, त्याआधी टीम इंडियाचे फक्त 7 सामने उरले आहेत. वर्ल्ड कपसाठी बुमराह टीमचं महत्त्वाचं अस्त्र आहे. 2024 चा टी-20 वर्ल्ड कप भारताला जिंकवण्यातही बुमराहने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
advertisement
6/6
कटकमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात बुमराहने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट पूर्ण केल्या. तिन्ही आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये 100 विकेट घेणारा बुमराह भारताचा पहिला बॉलर ठरला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Jasprit Bumrah : धर्मशालामधून निघाला, तडकाफडकी मुंबईत आला, बुमराहने अचानक का सोडली टीम इंडियाची साथ?