IND vs SA : संजुने जे एका मॅचमध्ये केलं, ते गिलला संपूर्ण मालिकेत जमलं नाही, उप कर्णधाराला मोठा झटका
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
संजू सॅमसनला मागच्या चार सामन्यात संधीच मिळाली नव्हती. कारण शुभमन गिलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळत होती.त्यामुले संजु सॅमसन बेंचवर बसला होता.
advertisement
1/7

अहमदाबादच्या मैदानावर भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात सूरू असलेल्या पाचव्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात संजू सॅमसनने मोठा कारनामा केला आहे.
advertisement
2/7
संजू सॅमसनला मागच्या चार सामन्यात संधीच मिळाली नव्हती. कारण शुभमन गिलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळत होती.त्यामुले संजु सॅमसन बेंचवर बसला होता.
advertisement
3/7
आज शेवटच्या सामन्यात संजु सॅमसनला संधी मिळाली होती. या संधीच सोनं करत त्याने वादळी खेळी केली होती.
advertisement
4/7
संजुला पाचव्या टी20 मध्ये मोठ्या धावा करता आल्या नाही.पण त्याने 37 धावांची वादळी खेळी केली.या खेळी दरम्यान त्याने 2 षटकार आणि 4 चौकार मारले आहेत.
advertisement
5/7
संजूने त्याच्या एका सामन्यात 37 धावा केल्या होत्या.तर शुभमन गिलने संपूर्ण मालिकेत (4 सामन्यात) 32 धावा केल्या आहेत.
advertisement
6/7
पहिल्या टी20 त शुभमन गिलने 4 धावा, दुसर्‍या टी20 त शून्य धावा, तिसऱ्या मॅचमध्ये त्याने 28 धावा केल्या. चौथी मॅच धुक्यामुळे होऊच शकली नाही.त्यामुळे त्याने संपूर्ण मालिकेत (3 मॅचमध्ये) फक्त 32 धावा केल्या.या दरम्यान गिलचे अॅव्हरेज 10.67 होती.
advertisement
7/7
दरम्यान टी 20 वर्ल्ड कप 2026 तोंडावर असताना शुभमन गिलची ही कामगिरी पाहता टीम इंडियाला मोठा धोका आहे.त्यामुळे त्याच्या जागी संजूला जागा मिळावी, अशी मागणी होते आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : संजुने जे एका मॅचमध्ये केलं, ते गिलला संपूर्ण मालिकेत जमलं नाही, उप कर्णधाराला मोठा झटका