IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडविरुद्धचा पहिला वनडे सामना कधी आणि कुठे सुरू होणार? कुठं पाहाल LIVE? टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
India vs New Zealand 1st ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना तुम्ही घरबसल्या किंवा प्रवास काम करताना देखील पाहू शकता. स्टार स्पोर्ट्स आणि जिओ हॉटस्टारवर हा सामना तुम्हाला लाईव्ह पाहता येणार आहे.
advertisement
1/7

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे सिरीजचा पहिला सामना रविवारी बडोदरा येथे खेळवला जाणार आहे. कॅप्टन शुभमन गिल याच्या नेतृत्वाखाली भारतीय टीम या वर्षाची दणक्यात सुरुवात करण्यासाठी मैदानात घाम गाळत आहे.
advertisement
2/7
विशेष म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दिग्गज खेळाडू या सिरीजमध्ये खेळणार असल्याने चाहत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. यंदाच्या वर्षात पहिल्यांदाच दोन्ही दिग्गज मैदानावर असतील.
advertisement
3/7
हा सामना दुपारी 1:30 वाजता सुरू होईल, तर मॅचच्या अर्धा तास आधी म्हणजे 1 वाजता टॉस होईल. बडोद्याच्या मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे.
advertisement
4/7
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना तुम्ही घरबसल्या किंवा प्रवास काम करताना देखील पाहू शकता. स्टार स्पोर्ट्स आणि जिओ हॉटस्टारवर हा सामना तुम्हाला लाईव्ह पाहता येणार आहे.
advertisement
5/7
या सिरीजमधील दुसरा सामना 14 जानेवारी रोजी राजकोट येथे होणार असून, तिसरी आणि शेवटची वनडे 18 जानेवारीला इंदूरमध्ये खेळवली जाईल. सर्व मॅचेस दुपारी दीड वाजता सुरू होतील.
advertisement
6/7
फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर या सिरीजला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. वनडे सिरीज संपल्यानंतर 21 जानेवारीपासून पाच सामन्यांच्या टी-20 सिरीजला सुरुवात होईल.
advertisement
7/7
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा, शुभमन गिल (कॅप्टन), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वाशिंगटन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह आणि मोहम्मद सिराज.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडविरुद्धचा पहिला वनडे सामना कधी आणि कुठे सुरू होणार? कुठं पाहाल LIVE? टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन