IPL 2025 : 10 मॅचमध्ये 8 सेंच्युरी, आयपीएल गाजवायला 'तो' आलाय...! MI पासून CSK ही लावणार बोली
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Agni Chopra In IPL 2025 Auction : आयपीएलचा मेगा लिलाव येत्या 24 आणि 25 तारखेला पार पडणार आहे. अशातच लिलावात असा एक खेळाडू येणार आहे, ज्याला घेण्यासाठी अनेक टीम उत्सुक असतील. कोण आहे तो आणि त्याचं बॉलिवूडसोबत कनेक्शन काय? जाणून घ्या
advertisement
1/7

अनेक खेळाडू आयपीएल लिलावासाठी अर्ज दाखल करत असतात. लिलाव प्रक्रियेत सहभाग नोंदवण्यााठी अशा एका खेळाडूने नाव नोंदवलंय, ज्याची मुंबई इंडियन्सपासून ते गुजरात देखील वाट पाहत आहे.
advertisement
2/7
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये धावांचा रतीब घालणारा हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसुन अग्नी चोप्रा आहे. तुमच्यापैकी अनेकांनी हे नाव आधीही ऐकलं असेल. क्रिकेटमध्ये नाही तर बॉलिवूडमधून...
advertisement
3/7
अग्नी चोप्रा याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 10 सामन्यांमध्ये 92.11 च्या सरासरीने 1658 धावा केल्या असून त्यातच 8 शतकांचा समावेश आहे. त्यामुळे त्याला शतक झळकावणारी मशीन म्हणून देखील ओळखलं जातंय.
advertisement
4/7
अग्नी चोप्रा हा प्रसिद्ध दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांचा मुलगा आहे. मात्र, आपल्या मेहनतीच्या जोरावर अग्नीने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला अन् क्रिकेटची आवड जपली.
advertisement
5/7
अग्नीने 26 व्या वयात आपल्या फलंदाजीची जादू दाखवली आणि आयपीएल लिलावासाठी शड्डू ठोकला आहे. तो पहिल्यांदाच आयपीएल लिलावात दिसेल. त्यामुळे त्याच्यावर बोली कोणता संघ लावणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
advertisement
6/7
अग्नि चोप्राचं शॉट सिलेक्शन हिच त्याची खासियत आहे. त्यामुळे त्याला आयपीएल लिलावात बोली लागणार का? असा सवाल आहे. भारत आणि परदेशामधील 1574 खेळाडूंच्या यादीत आता तो देखील दिसणार आहे.
advertisement
7/7
दरम्यान, शुभमन गिल आणि अग्नी दोघंही चांगले मित्र आहेत. अग्नीचा वाढदिवसाला दोघंही एकत्र दिसले होते. अशातच आता गुजरात टायटन्स अग्नीला संघात घेणार का? अशी औत्सुकता लागली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2025 : 10 मॅचमध्ये 8 सेंच्युरी, आयपीएल गाजवायला 'तो' आलाय...! MI पासून CSK ही लावणार बोली