TRENDING:

IPL 2026 : 14 कोटी देऊनही पायावर धोंडा मारला... धोनी नसताना CSK च्या डग आऊटमध्ये ड्रामा!

Last Updated:
आयपीएल 2026 च्या मोसमामध्ये चेन्नई सुपरकिंग्स नव्या चेहऱ्यांसह मैदानात उतरत आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमात शेवटच्या क्रमांकावर राहिल्यानंतर सीएसकेने टीममध्ये बदल करायला सुरूवात केली.
advertisement
1/7
14 कोटी देऊनही पायावर धोंडा मारला... धोनी नसताना CSK च्या डग आऊटमध्ये ड्रामा!
सीएसकेने लिलावाआधी रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांना राजस्थानला दिलं तर राजस्थानकडून संजू सॅमसनला टीममध्ये आणलं. याशिवाय लिलावामध्येही सीएसकेने तरुणांना संधी दिली.
advertisement
2/7
आयपीएलच्या या मोसमाआधी मात्र सीएसकेला एका मागोमाग एक धक्के लागले. एमएस धोनी दुखापतीमुळे किमान दोन आठवडे खेळू शकणार नाही. तर फास्ट बॉलर नॅथन एलिसही दुखापतीमुळे आयपीएलमधूनच बाहेर झाला आहे. डेवाल्ड ब्रेविसही दुखापतीमुळे राजस्थानविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून बाहेर झाला.
advertisement
3/7
खेळाडूंना इतक्या दुखापती झाल्यामुळे सीएसकेने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात बऱ्याच युवा खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली, पण 14 कोटींच्या खेळाडूला बेंचवर बसवलं.
advertisement
4/7
आयपीएलच्या लिलावामध्ये सीएसकेने प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा यांच्यासाठी प्रत्येकी 14.20-14.20 कोटी रुपये मोजले, पण राजस्थानविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात सीएसकेने प्रशांत वीर याला संधीच दिली नाही.
advertisement
5/7
आयपीएलचा मोसम सुरू व्हायच्या आधी नेट प्रॅक्टिस करताना खुद्द एमएस धोनीने प्रशांत वीरच्या बॅटिंगचं कौतुक केलं होतं. नेटमध्ये प्रशांतने ऑफ साईडच्या दिशेने, मग स्कूप शॉट आणि त्यानंतर स्ट्रेट ड्राईव्ह मारला. प्रशांत वीरची बॅटिंग पाहून धोनीने शॉट अशी प्रतिक्रिया दिली. धोनीनेही कौतुक केल्यानंतर प्रशांत वीरला पहिल्याच सामन्यात संधी मिळेल, असं वाटत होतं, पण त्याला संधी मिळाली नाही.
advertisement
6/7
बॅटिंसह डावखुरी स्पिन बॉलिंग टाकणाऱ्या प्रशांत वीरकडे सीएसकेचा रवींद्र जडेजाचा पर्याय म्हणूनही पाहिलं जात होतं, पण प्रशांतला सीएसकेने न खेळवण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
advertisement
7/7
आयपीएल लिलावामध्ये 14.20 कोटी मिळाल्यानंतर एमएस धोनीने प्रशांतला पैसे वाचवण्याचा तसंच पाय जमिनीवर ठेवण्याचा सल्ला दिला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : 14 कोटी देऊनही पायावर धोंडा मारला... धोनी नसताना CSK च्या डग आऊटमध्ये ड्रामा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल