IPL 2026 : नियम धाब्यावर बसवले, नको ती कृत्य केली... 8 दिग्गज खेळाडू आयपीएलमधून बॅन!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 ला शनिवार 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे, पण पहिल्या सामन्याआधीच आयपीएलने दिग्गज खेळाडूवर बंदी घातली आहे.
advertisement
1/8

आयपीएल 2026 च्या लिलावात बेन डकेटला दिल्ली कॅपिटल्सने 2 कोटी रुपयांना विकत घेतलं, पण इंग्लंडच्या या खेळाडूने शेवटच्या क्षणी आयपीएलमध्ये खेळायला नकार दिला आहे. लिलावात नाव नोंदवूनही खेळायला न आल्यामुळे बेन डकेटवर पुढच्या 2 मोसमांमध्ये बंदी घातली जाणार आहे.
advertisement
2/8
बेन डकेटच्या आधी इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुक यानेही लिलावात नाव नोंदवून आणि बोली लागल्यानंतरही आयपीएल 2025 मधून माघार घेतली होती, त्यामुळे आता हॅरी ब्रुक आयपीएल 2027 पर्यंत आयपीएल खेळू शकणार नाही.
advertisement
3/8
2019 च्या आयपीएल लिलावात लेग स्पिनर प्रविण तांबे याच्यावर केकेआरने बोली लावली. पण 2018 मध्ये तांबे बीसीसीआयची परवानगी नसलेली टी-10 लीग खेळला होता, त्यामुळे त्याच्यावर आयपीएल खेळायला बंदी घातली गेली.
advertisement
4/8
आयपीएल 2018 मध्ये स्टीव्ह स्मिथ राजस्थानचं नेतृत्व करणार होता, पण मार्च 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात स्मिथ बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळला, त्यामुळे त्याच्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक वर्षाची बंदी घातली आणि स्मिथ आयपीएल खेळू शकला नाही.
advertisement
5/8
स्टीव्ह स्मिथसोबतच डेव्हिड वॉर्नरही बॉल टॅम्परिंगमध्ये दोषी आढळला, त्यामुळे त्याच्यावरही वर्षभर क्रिकेट खेळायला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बंदी घातली. या कारणामुळे वॉर्नरही 2018 ची आयपीएल खेळू शकला नाही.
advertisement
6/8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ल्युक पॉमर्सबॅक याच्यावर अमेरिकेची एक महिला आणि तिच्या होणाऱ्या पतीवर हल्ला केल्याचा आरोप झाला. आयपीएल सुरू असतानाच हॉटेलमध्ये पॉमर्सबॅकने हे कृत्य केलं, त्यामुळे आरसीबीने त्याला निलंबित केलं.
advertisement
7/8
आयपीएल 2010 मध्ये टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजावरही बंदी घातली गेली. राजस्थानकडून खेळत असताना जडेजाने आयपीएलमधल्या इतर टीमसोबत डीलची बोलणी केली होती, त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.
advertisement
8/8
आयपीएलच्या पहिल्याच मोसमात मुंबई इंडियन्सच्या हरभजन सिंग याने पंजाबचा फास्ट बॉलर श्रीसंतच्या कानाखाली मारली, त्यामुळे हरभजन सिंगचं उरलेल्या सामन्यांसाठी निलंबन करण्यात आलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : नियम धाब्यावर बसवले, नको ती कृत्य केली... 8 दिग्गज खेळाडू आयपीएलमधून बॅन!