IPL Auction 2026: दोन मुंबईकर खेळाडूंची वाट लागली, टॉप 5 मधील चौघांना रूपयाही मिळाला नाही
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आयपीएल 2026 च्या मेगा लिलावात आज अबुधाबीमध्ये सुरूवात झाली आहे. या लिलावात 369 खेळाडूंवर बोली लागणार आहे. पण 77 खेळाडूंची खरेदी केली जाणार आहे.
advertisement
1/7

आयपीएल 2026 च्या मेगा लिलावात आज अबुधाबीमध्ये सुरूवात झाली आहे. या लिलावात 369 खेळाडूंवर बोली लागणार आहे. पण 77 खेळाडूंची खरेदी केली जाणार आहे.
advertisement
2/7
पहिल्या सेटमध्ये 5 खेळाडूंवर बोली लागली. पण ही बोली खूपच धक्कादायक होती.कारण पहिल्या सेटमध्ये तीन दिग्गज खेळाडू अनसोल्ड राहिले आहे.
advertisement
3/7
ऑस्ट्रेलियाचा जेक फ्रेसर मॅकगर्कची 2 कोटी ही बेसप्राईज होती. पण कोणत्याच संघाने त्याला खरेदी करण्यासाठी उत्सुकता दाखवली नाही
advertisement
4/7
त्यानंतर डेविड मिलरवर बोली लागली. मिलरची बेस प्राईज 2 कोटी होती. साऊथ आफ्रिकेच्या या दिग्गद खेळाडूवर बोली लागेल असे वाटत होते. पण डेविड मिलर दिल्ली कॅपिटलने 2 कोटीत उचलले आहे.
advertisement
5/7
पृथ्वी शॉवर बोली लावण्यात आली होती.75 लाख त्याची बेस प्राईज होती. पृथ्वी शॉ सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट खेळतोय. त्यामुळे त्याच्यावर मोठी बोली लागेल अशी त्याची अपेक्षा होती. पण तो अनसोल्ड ठरणार आहे.
advertisement
6/7
डेवॉन कॉन्वे हा देखील अनसोल्ड राहिला आहे. न्यूझीलंडचा हा दिग्गज खेळाडू 2 कोटीच्या बेसप्राईजवर मैदानात होता. पण त्याला कोणत्याही फ्रेंचायजीने खरेदीसाठी उत्सुकता दाखवली नाही.
advertisement
7/7
सरफराज खान देखील लिलावात अनसोल्ड राहिला. 75 लाख त्याची बेसप्राईज होती.त्यात तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. त्यामुळे त्याला मोठी बोली लागेल अशी अपेक्षा होती. पण त्याला कोणत्याच फ्रेंचायजीने खरेदीच केले नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL Auction 2026: दोन मुंबईकर खेळाडूंची वाट लागली, टॉप 5 मधील चौघांना रूपयाही मिळाला नाही