TRENDING:

'माझ्या चुलत भावांना वाटलं मी मेले...', जेमिमा रॉड्रीग्जसोबत घडलेली धक्कादायक घटना, अंगावर काटा येईल

Last Updated:
टीम इंडियाची स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रीग्ज वुमेन्स प्रिमियर लिगमध्ये पहिल्यांदाच दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे.त्यामुळे या स्पर्धेसाठी ती प्रचंड उत्सुक आहे.
advertisement
1/7
'माझ्या चुलत भावांना वाटलं मी मेले...', जेमिमा रॉड्रीग्जसोबत घडलेली धक्कादायक घट
टीम इंडियाची स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रीग्ज वुमेन्स प्रिमियर लिगमध्ये पहिल्यांदाच दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे.त्यामुळे या स्पर्धेसाठी ती प्रचंड उत्सुक आहे.
advertisement
2/7
या स्पर्धेआधी अभिनेता आणि क्रिकेट प्रेझेंटर गौरव खन्नाने जेमिमा रॉड्रीग्जची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत जेमिमा रॉड्रीग्जने तिच्यासोबत लहाणपणी घडलेली धक्कादायक घटना सांगितली आहे.
advertisement
3/7
जेमिमा रॉड्रिग्ज आठ वर्षांची असताना तिच्यासोबत एक घटना घडली होती. जेमिमा चर्चेच्या कार्यक्रमात गेली होती. यावेळी सगळी मोठी माणसे चर्चेच्या आत होती, तर लहान मुले बाहेर खेळत होती.
advertisement
4/7
या लहान मुलांमध्ये जेमिमा आणि तिचे चुलत भाऊ देखील होते. यावेळी त्यांनी चप्पलांनी खेळायला सूरूवात केली होती.
advertisement
5/7
खेळता खेळता चुलत भावाने माझ्या चपला दुरवर फेकल्या. त्यामुळे या चपला आणण्यासाठी दुसऱ्या बाजूला उडी मारावी लागणार होती, असे जेमिमाने सांगितले.
advertisement
6/7
या घटनेनंतर जेमिमाने धाडस दाखवत आपल्या चपला मिळवण्याचा प्रयत्न केला. पण या दरम्यान मी पहिल्या मजल्यावरून पडले. सुदैवाने कुणीतरी खाली बसले असल्याने मी त्याच्या डोक्यावर पडले.त्यावेळेस माझ्या चुलत भावांना वाटलं मी मेले, असे जेमिमा मुलाखतीत सांगते. पण सुदैवाने ती वाचली होती.
advertisement
7/7
दरम्यान दिल्ली कॅपिटल्सने जेमिमाला नवीन कर्णधार म्हणून निवडले आहे. यावर बोलताना जेमीमा म्हणाली, दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार म्हणून निवड होणे हा एक पूर्ण सन्मान आहे आणि या संघाचे नेतृत्व करण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी मालक आणि सपोर्ट स्टाफची मनापासून आभारी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
'माझ्या चुलत भावांना वाटलं मी मेले...', जेमिमा रॉड्रीग्जसोबत घडलेली धक्कादायक घटना, अंगावर काटा येईल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल