TRENDING:

PAK vs SL : पाकिस्तान सेमीफायनलमधून बाहेर, सलमान आगा रडकुंडीला आला, कुणावर फोडलं खापर? कॅप्टनची जाहीर कबुली

Last Updated:
Salman Ali Agha Statement : पाकिस्तानला 147 धावांच्या आत श्रीलंकेला गुंडाळणं गरजेचं होतं. पण पाकिस्तानच्या बॉलर्सने मार खाल्ला. पाकिस्तानच्या प्रिमियम बॉलर्सची धुलाई झाली.
advertisement
1/7
PAK vs SL : पाकिस्तान सेमीफायनलमधून बाहेर, सलमान आगा रडकुंडीला आला
आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून पाकिस्तानचा संघ बाहेर झाला आहे. पाकिस्तानला काल श्रीलंकेविरुद्ध मोठ्या मार्जिनने मॅच जिंकण्याची गरज होती, मात्र पाकिस्तानला स्कोर डिफेन्ड करता आला नाही.
advertisement
2/7
पाकिस्तानला 147 धावांच्या आत श्रीलंकेला गुंडाळणं गरजेचं होतं. पण पाकिस्तानच्या बॉलर्सने मार खाल्ला. पाकिस्तानच्या प्रिमियम बॉलर्सची धुलाई झाली. अशातच मॅच जिंकल्यानंतर पाकिस्तानच्या कॅप्टनने मोठं वक्तव्य केलं आहे.
advertisement
3/7
टॉस हरल्यामुळे परिस्थिती अधिक कठीण झाली होती, कारण रात्रीच्या वेळी पडणाऱ्या दवाचा खेळावर मोठा परिणाम झाला.160 रन्स जरी केले असते, तरी या खेळपट्टीवर त्या डिफेंड करणं आव्हानात्मक ठरलं असतं, असं मत सलमान अली आगा याने व्यक्त केलं आहे.
advertisement
4/7
आजच्या मॅचमध्ये नक्कीच दवाचा खेळावर मोठा परिणाम झाला. तेच आमच्या सेमीफायनलमधील पराभवास कारणीभूत आहे. दवामुळे बॉलवर पकड मिळवणे कठीण जात होते, ज्यामुळे आमचे प्लॅन फिसकटला, असंही सलमान म्हणाला.
advertisement
5/7
साहिबजादा फरहानने अपवादात्मक बॅटिंग केली, मात्र त्याला दुसऱ्या बाजूने कोणाचीही साथ मिळाली नाही. जर इतर बॅटर्सनी त्याला थोडी मदत केली असती, तर स्पर्धेचे चित्र वेगळे दिसले असतं, असं म्हणत त्याने मिडल ऑर्डरवर खापर फोडलं आहे.
advertisement
6/7
पाकिस्तान टीमची सर्वात मोठी कमकुवत बाजू म्हणजे त्यांची मिडल ऑर्डर असल्याचे सलमानने मान्य केले. गेल्या काही वर्षांपासून मिडल ऑर्डरची समस्या टीमला सतावत आहे आणि आता त्यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, असं म्हणत त्याने वॉर्निंग देखील दिलीये.
advertisement
7/7
दरम्यान, आम्ही इनिंगचा शेवट ज्या पद्धतीने करायला हवा होता, तसा करू शकलो नाही. 18 ओव्हर्सपर्यंत आम्ही चांगली बॅटिंग केली, पण शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये प्रतिस्पर्धी टीमने वरचढ कामगिरी केली, असंही सलमान यावेळी म्हणालाय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
PAK vs SL : पाकिस्तान सेमीफायनलमधून बाहेर, सलमान आगा रडकुंडीला आला, कुणावर फोडलं खापर? कॅप्टनची जाहीर कबुली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल