बाबो! 10500 साड्या, 1250 किलो चांदी आणि 28 किलो सोनं; भारतातील सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री
- Published by:Priya Lad
Last Updated:
Richest Actress : एकेकाळी भारतातील सगळ्यात श्रीमंत असणारी ही अभिनेत्री, जी आतापर्यंतची सर्वात श्रीमंत भारतीय अभिनेत्री असल्याचं म्हटलं जातं. जी अफाट संपत्तीमुळे वादातही सापडली.
advertisement
1/9

सेलिब्रिटी म्हटलं की त्यांची लाइफस्टाईल खूपच ग्लॅमरस, लॅव्हिश असते. त्यामुळे त्यांच्या संपत्तीबाबत जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. भारतात कितीतरी अभिनेत्री आहेत, ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे. आता म्हणाल तर अभिनेत्री जुही चावला सगळ्यात श्रीमंत भारतीय अभिनेत्री आहे. पण खरं तर एक अभिनेत्री जिच्या संपत्तीसमोर जुही चावलाची संपत्तीही काहीच नाही.
advertisement
2/9
या अभिनेत्रीच्या घरावर छापा टाकण्यात आला तेव्हा तिची प्रचंड संपत्ती उघडकीस आली. ज्यात 10 हजारांहून अधिक साड्या, हजारोंहून अधिक चांदी आणि कित्येक किलो सोनं सापडलं. या अभिनेत्रीचं नाव आहे जयललिता, ज्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीही होत्या. जयललिता या त्यांच्या पिढीतील सर्वात यशस्वी तामिळ अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी त्यांच्या सुपरहिट चित्रपट आणि राजकीय कारकिर्दीद्वारे प्रचंड संपत्ती जमवली.
advertisement
3/9
जयललिता यांचा जन्म 1948 मध्ये म्हैसूर जे आता कर्नाटकातील मंड्या आहे तिथं झाला. 1961 मध्ये त्यांनी श्री शैला महात्मे या कन्नड चित्रपटात बालकलाकार म्हणून काम करून अभिनेत्री म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
advertisement
4/9
चित्रपट आणि नाटकांमध्ये छोट्या भूमिका केल्यानंतर 1960 च्या दशकाच्या मध्यात त्यांनी तामिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये आघाडीची अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. त्यांनी तामिळ, तेलगू आणि कन्नडसह सुमारे 140 चित्रपटांमध्ये काम केलं.
advertisement
5/9
त्यांनी फक्त एकच हिंदी फिल्म केली, ती आहे इज्जत. 1968 साली आलेली ही फिल्म ज्यात धर्मेंद्र, तनुजा यांच्यासोबत जयललिता मुख्य भूमिकेत होत्या. या चित्रपटात जयललिता यांनी आदिवासी मुलगी झुमकीची भूमिका साकारली होती. एनटी रामाराव, अक्किनेनी नागेश्वर राव, जयशंकर आणि एमजी रामचंद्रन यांच्यासह काही सर्वात यशस्वी अभिनेत्यांसोबत काम केल्यानंतर त्या 1970 च्या दशकात दक्षिणेत आघाडीच्या अभिनेत्री बनल्या.
advertisement
6/9
सिनेक्षेत्रात करिअर पीकवर असतानाच वयाच्या 31 व्या वर्षी त्यांनी चित्रपटांमधून निवृत्ती घेतली. 1980 मध्ये त्यांनी अभिनय सोडून राजकारणात प्रवेश केला. 1991 ते 2016 दरम्यान त्यांनी पाच वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून काम केलं.
advertisement
7/9
1997 मध्ये जयललिता त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या शिखरावर असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोपझाला. अधिकाऱ्यांनी त्यांच्या चेन्नईतील पोएस गार्डन येथील निवासस्थानी छापा टाकला. ज्यामध्ये 10500 साड्या, 750 जोडी चपला, 91 घड्याळं, तसंच 800 किलो चांदी आणि 28 किलो सोन्याचा समावेश होता.
advertisement
8/9
त्यानंतर 2016 साली पुन्हा छापा टाकण्यात आला. तेव्हा 1250 किलो चांदी आणि 21 किलो सोनं असल्याचं उघड झालं. त्यांच्याकडे 42 कोटींची जंगम मालमत्ता आणि 8 कार होत्या. त्यावेळी जयललिता यांची एकूण मालमत्ता त्यांनी जारी केलेल्या संपत्तीपेक्षा खूपच जास्त होती.
advertisement
9/9
डिसेंबर 2016 मध्ये वयाच्या 68 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. यानंतर अनेक श्रीमंत अभिनेत्रींची यादी समोर आली यात आता अभिनेत्री जुही चावलाचं नाव आहे. पण सर्वात श्रीमंत अभिनेत्रीच्या बाबतीत जयललिता यांचा रेकॉर्ड कोणतीच अभिनेत्री मोडू शकली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बाबो! 10500 साड्या, 1250 किलो चांदी आणि 28 किलो सोनं; भारतातील सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री