TRENDING:

World Cup : पाकिस्तानचे 10 कर्णधार भारतात फेल, नंबर 1 बाबर बदलणार इतिहास?

Last Updated:
एकाही पाकिस्तानी कर्णधाराला भारतात एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक करता आलेलं नाही. १० पैकी पाच जणांना ५० पेक्षा जास्त धावा करता आल्या.
advertisement
1/9
World Cup : पाकिस्तानचे 10 कर्णधार भारतात फेल, नंबर 1 बाबर बदलणार इतिहास?
बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कप २०२३ खेळण्यासाठी सज्ज आहे. दरम्यन, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने व्हिसाचा मुद्दा उपस्थित केला होता. पण आता व्हिसा मिळाला आहे.
advertisement
2/9
पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कपचा १३ वा हंगाम खेळण्यासाठी २७ सप्टेंबर रोजी हैदराबादला पोहोचणार आहे. त्यानंतर २९ सप्टेंबरला न्यूझीलंडविरुद्ध सराव सामना होणार आहे. सुरक्षेच्या कारणामुळे या सामन्यात प्रेक्षकांना जाता येणार नाही.
advertisement
3/9
वर्ल्ड कपमध्ये बाबर आझमच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. सध्या तो वनडेतला नंबर एकचा फलंदाज आहे. भारतात तो पहिल्यांदाच खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना १४ ऑक्टोबरला होणार आहे.
advertisement
4/9
पाकिस्तानच्या कर्णधारांसाठी भारतात खेळणं हे आजपर्यंतचा इतिहास पाहता सोपं नाहीय. एकाही पाकिस्तानी कर्णधाराला भारतात एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक करता आलेलं नाही. १० पैकी पाच जणांना ५० पेक्षा जास्त धावा करता आल्या. कर्णधार म्हणून एका वनडेत सर्वाधिक ८९ धावा शोएब मलिकने केल्या होत्या.
advertisement
5/9
भारतात एकूण धावा करणाऱ्या पाकिस्तानी कर्णधारांमध्ये इम्रान खान अव्वल स्थानी आहेत. त्यांनी १३ डावात ३९६ धावा केल्या आहेत. यात ३ अर्धशतकांचा समावेश आहे. तर इंझमान उल हकलने ७ डावात ३०३ धावा केल्या आहेत.
advertisement
6/9
रमीज राजाने ५ डावात २०० तर शोएब मलिकने ५ डावात १५० धावा केल्या आहेत. वसीम आक्रमने पाच पैकी चार सामन्यात ११५ धावा केल्या आहेत.
advertisement
7/9
पाकिस्तानच्या इतर कर्णधारांना एकूण १०० धावाही करता आल्या नाहीत. जहीर अब्बासने ६८, मिस्बाह उल हकने ५७ , आमिर सोहेलने ५५, शाहिद आफ्रिदीने १९ तर युनिस खानने १६ धावा केल्या आहेत.
advertisement
8/9
खेळाडू म्हणून भारता पाकिस्तानकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३ शतके सलमान बटने केली आहेत. याशिवाय एक अर्धशतकही झळकावलं आहे.
advertisement
9/9
नासिर जमशेदने २, सईद अन्वर, शाहिद आफ्रिदी आणि युनिस खान यांनीही खेळाडू म्हणून प्रत्येकी एक शतक केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
World Cup : पाकिस्तानचे 10 कर्णधार भारतात फेल, नंबर 1 बाबर बदलणार इतिहास?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल