TRENDING:

PAK vs NZ : पाकिस्तानला पावसाने वाचवलं! सुपर 8 च्या पहिल्याच सामन्यात कॅप्टन सलमानने केली घोडचूक, कुणाच्याच लक्षात आलं नाही

Last Updated:
Pakistan vs New zealand : टॉस जिंकून सलमान अली आगा याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. पण हाच निर्णय पाकिस्तानच्या अंगलटी आला असता.
advertisement
1/7
PAK vs NZ : कॅप्टन सलमानने केली घोडचूक, कुणाच्याच लक्षात आलं नाही
टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सुपर-8 फेरीचा पहिलाच सामन्यात पावसाने हिरमोड केला. दोन्ही बलाढ्य संघांमध्ये होणारा हा सामना सेमीफायनलसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता.
advertisement
2/7
शनिवारी सायंकाळी 6:30 वाजता मॅचला सुरुवात होणार होती, पण पावसाचा जोर अचानक वाढल्याने परिस्थिती बदलली. पाऊस सुरू होण्यापूर्वी टॉस पार पडला. पाकिस्तानचा कॅप्टनने टॉस जिंकला.
advertisement
3/7
टॉस जिंकून सलमान अली आगा याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. पण हाच निर्णय पाकिस्तानच्या अंगलटी आला असता. पावसाने पाकिस्तानला वाचवलं नाहीतर पाकिस्तानची हकालपट्टी निश्चित होती.
advertisement
4/7
पाकिस्तानच्या कॅप्टनची ही चूक कुणाच्याच लक्षात आली नाही. पावसाचं वातावरण असताना ओव्हर्स घटवल्या असत्या तर चेस करणं अधिक सोपं झालं असतं. पाकिस्तानच्या कॅप्टनच्या डोक्यात ही गोष्टच आली नाही.
advertisement
5/7
डवर्थ लुईसच्या आधारावर पाकिस्तानला चेस करणं सोपं गेलं असतं. त्यामुळे सलमानच्या निर्णयावर पाकिस्तानमधून देखील टीका होताना दिसत आहे. अनेक माजी खेळाडूंनी सलमानच्या निर्णयाला हास्यास्पद म्हटलं आहे.
advertisement
6/7
पाकिस्तानची कमकुवत फलंदाजी पाहता सलमान अली आगा याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असावा. बॉलिंगच्या जिवावर मॅच जिंकण्याचं स्वप्न पाकिस्तान पाहतंय. अशातच पावसामुळे मोठा घोळ झाला असता.
advertisement
7/7
दरम्यान, पाकिस्तानचा पुढील सामना 24 फेब्रुवारी रोजी इंग्लंडविरुद्ध असेल, तर 28 फेब्रुवारी रोजी श्रीलंकेचा सामना पाकिस्तानशी होईल. त्यामुळे आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
PAK vs NZ : पाकिस्तानला पावसाने वाचवलं! सुपर 8 च्या पहिल्याच सामन्यात कॅप्टन सलमानने केली घोडचूक, कुणाच्याच लक्षात आलं नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल