TRENDING:

R Ashwin : रविचंद्रन अश्विनची टीम इंडियात एंन्ट्री, मोठ्या स्पर्धेत खेळताना दिसणार

Last Updated:
आर.अश्विनची टीम इंडियात एंन्ट्री झाली आहे.त्यामुळे आता हा दिग्गज उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज हाँगकाँग सिक्सेसमध्ये टीम इंडियाकडून खेळताना दिसणार आहे.
advertisement
1/6
R Ashwin : रविचंद्रन अश्विनची टीम इंडियात एंन्ट्री, मोठ्या स्पर्धेत खेळताना दिसण
टीम इंडियाचा अनुभवी स्पिनर गोलंदाज आर अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.या निवृत्तीनंतर आता तो पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे.
advertisement
2/6
आर.अश्विनची टीम इंडियात एंन्ट्री झाली आहे.त्यामुळे आता हा दिग्गज उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज हाँगकाँग सिक्सेसमध्ये टीम इंडियाकडून खेळताना दिसणार आहे.
advertisement
3/6
ही स्पर्धा 7 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे आणि 9 नोव्हेंबरला अंतिम सामना होणार आहे.
advertisement
4/6
आर. अश्विनने ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि अलीकडेच आयपीएलमधून निवृत्ती घेतली. आता तो परदेशी लीगमध्ये खेळताना दिसेल.
advertisement
5/6
हाँगकाँग सिक्सेसची सुरुवात १९९२ मध्ये झाली आणि एकूण १२ संघ या स्पर्धेत खेळतात. पाकिस्तान हा या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे, ज्याने पाच वेळा विजेतेपद जिंकले आहे. भारताने ही स्पर्धा फक्त एकदाच जिंकली, २००५ मध्ये, तर १९९२ आणि १९९६ मध्ये अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला.
advertisement
6/6
हाँगकाँग सिक्समध्ये सहा खेळाडूंच्या दोन संघांचा समावेश आहे. प्रत्येक खेळाडू फक्त एक षटक टाकू शकतो आणि एक डाव सहा षटकांचा असतो. या स्पर्धेत कोणतेही फ्री हिट किंवा नो-बॉल नाहीत. एकदा खेळाडूने पन्नास धावा केल्या की, तो क्रीजवर राहू शकत नाही; त्याला निवृत्त व्हावे लागते. प्रत्येक सामन्यात विजयासाठी दोन गुण दिले जातात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
R Ashwin : रविचंद्रन अश्विनची टीम इंडियात एंन्ट्री, मोठ्या स्पर्धेत खेळताना दिसणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल