TRENDING:

डॉमेस्टीकमध्ये शतक ठोकून थकला,आज पुन्हा वादळी खेळी, तरी संधी मिळेना, कोण आहे खेळाडू?

Last Updated:
रणजी ट्रॉफी 2025-26च्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सूरूवात झाली आहे. या टप्प्यातही मुंबईकडून खेळणाऱ्या सर्फराज खानची बॅट तळपली आहे.
advertisement
1/7
डॉमेस्टीकमध्ये शतक ठोकून थकला,आज पुन्हा वादळी खेळी, तरी संधी मिळेना, कोण आहे खेळ
रणजी ट्रॉफी 2025-26च्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सूरूवात झाली आहे. या टप्प्यातही मुंबईकडून खेळणाऱ्या सर्फराज खानची बॅट तळपली आहे.
advertisement
2/7
मुंबई आणि हैदराबाद यांच्यात सामना सूरू आहे. या सामन्यात सरफराज खानने शतकीय खेळी केली आहे.
advertisement
3/7
खरं तर प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या डावाची सूरूवात खूपच खराब झाली होती. मुंबईकडून अखिल हेरवाडकर आणि आकाश आनंद हे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले होते.
advertisement
4/7
त्यानंतर मुशीर खान 11 धावांवर बाद झाला. यानंतर मैदानात आलेल्या सिद्धेश लाड आणि सरफराज खानच्या जोडीने मुंबईचा डाव सावरला होता.
advertisement
5/7
या दरम्यान सरफराज खानने 123 बॉलमध्ये 103 धावांची नाबाद खेळी केली आहे. या खेळीत सरफराजने 4 षटकार आणि 9 चौकार लगावले आहेत. सरफराजसोबत सिद्धेश लाडने 76 धावांची नाबाद खेळी केली आहे.त्यामुळे मुंबईचा डाव 3 विकेट गमावून 265 धावा दिवसअखेर केल्या आहेत.
advertisement
6/7
दरम्यान सरफराज खानने मागच्या वर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत दोन शतकं ठोकली होती. त्यानंतर विजय हजारेमध्ये एक शतक आणि आता नवीन वर्षात रणजीत शतक ठोकलं आहे.
advertisement
7/7
विशेष म्हणजे याआधी सरफराजने आपलं वजन ही कमी केलं होते.त्यासोबत तीन फॉरमॅटमध्ये शतक ठोकूनही त्याला टीम इंडियात संधी मिळत नाही आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
डॉमेस्टीकमध्ये शतक ठोकून थकला,आज पुन्हा वादळी खेळी, तरी संधी मिळेना, कोण आहे खेळाडू?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल