Ravindra jadeja ने रोवला मैलाचा दगड! मराठमोळ्या झहीर खानच्या रेकॉर्ड ब्रेक, अशी कामगिरी करणारा पाचवा भारतीय
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Ravindra jadeja broke zaheer khan record : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नवा मैलाचा दगड गाठला आहे. जड्डूने झहीर खानचा महान रेकॉर्ड ब्रेक केलाय.
advertisement
1/7

इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी मॅचमध्ये रविंद्र जडेजाने ऐतिहासिक कामगिरी केली. ऑली पोपची विकेट घेतल्यानंतर जड्डूने इतिहास रचला.
advertisement
2/7
रविंद्र जडेजा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय बॉलर्सच्या यादीत पाचव्या स्थानी पोहोचला आहे.
advertisement
3/7
रविंद्र जडेजाने भारताचा महान वेगवान बॉलर झहीर खानला मागे टाकलंय. रविंद्र जडेजाच्या नावे आता 611 आंतरराष्ट्रीय विकेट्स जमा झाल्या आहेत.
advertisement
4/7
टीम इंडियाचा वर्ल्ड कप विजेता खेळाडू झहीर खान याने 610 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या होत्या. सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय बॉलर्सची यादी तो सहाव्या स्थानी घसरलाय.
advertisement
5/7
जडेजाच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानले जाते.
advertisement
6/7
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप 5 भारतीय बॉलर्सची यादीत देखील जडेजाचं टॉप पाचमध्ये नाव आहे. कसोटीत त्याने 314 विकेट्स घेतल्या आहेत.
advertisement
7/7
दरम्यान, रविंद्र जडेजा याने टी-ट्वेंटीमधून निवृत्ती घेतली आहे. पण तो अद्याप कसोटी आणि वनडे क्रिकेट खेळतो. मात्र, तो आता टेस्टमधून निवृत्ती घेणार का? असा सवाल विचारला जातोय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Ravindra jadeja ने रोवला मैलाचा दगड! मराठमोळ्या झहीर खानच्या रेकॉर्ड ब्रेक, अशी कामगिरी करणारा पाचवा भारतीय