Shilpa Shetty : 60 कोटींच्या वादात अडकलेली शिल्पा शेट्टी एका रात्रीत कमावते 2 कोटी, 'बॅस्टियन'चं सिक्रेट आलं बाहेर
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Shilpa Shetty Luxury Restaurant Bastian : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या 'बॅस्टियन' रेस्टॉरंटमध्ये एका रात्रीत २ ते ३ कोटींचा व्यवसाय होतो, शोभा डे यांनी हा धक्कादायक खुलासा केला.
advertisement
1/8

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या मालकीचे मुंबईतील लक्झरी रेस्टॉरंट 'बॅस्टियन' नेहमीच चर्चेत असते. हे केवळ सेलिब्रिटींच्या पार्ट्यांचे ठिकाण नाही, तर शिल्पाचा एक भक्कम व्यवसाय आहे.
advertisement
2/8
आता या रेस्टॉरंटच्या एकरात्रीच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत, जे ऐकून सर्वांनाच तोंडात बोट घालायला लागतील. प्रसिद्ध लेखिका आणि सोशलाईट शोभा डे यांनी हा धक्कादायक खुलासा केला आहे.
advertisement
3/8
'मोजो स्टोरी'वरील एका मुलाखतीत शोभा डे यांनी मुंबईतील पैशांच्या व्यवहारांवर बोलताना 'बॅस्टियन'चा उल्लेख केला. त्यांनी दावा केला की, शिल्पा शेट्टीच्या या रेस्टॉरंटमध्ये कथितरित्या एका रात्रीत २ ते ३ कोटी रुपयांचा व्यवसाय होतो.
advertisement
4/8
शोभा डे म्हणाल्या, "मुंबईत कोणत्या स्तरावर पैसा आहे, हे पाहून मी हैराण झाले आहे. मुंबईतील एकाच रेस्टॉरंटचा एका रात्रीचा व्यवसाय २ ते ३ कोटी रुपये आहे. आठवड्याच्या दिवसांत ही कमाई २ कोटींच्या आसपास आणि वीकेंडला ती ३ कोटींपर्यंत जाते."
advertisement
5/8
शोभा डे यांना हे आकडे खोटे वाटले होते, म्हणून त्या स्वतः हे पाहण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये गेल्या होत्या. शोभा डे यांनी सांगितले की, २१,००० चौरस फूट क्षेत्रात पसरलेले 'बॅस्टियन' सध्या मुंबईत 'टॉप'वर आहे. या रेस्टॉरंटमध्ये एका रात्रीत १,४०० लोकांना जेवण दिले जाते, तेही दोन 'सिटिंग'मध्ये, प्रत्येक सिटिंगमध्ये ७०० लोक.
advertisement
6/8
सर्वात धक्कादायक म्हणजे, हे रेस्टॉरंट मुंबईतील जुन्या आणि पारंपरिक अशा दादर भागाच्या जवळ आहे. इथे जेवायला येणारे ग्राहक लॅम्बॉर्गिनी आणि अस्टन मार्टिनसारख्या महागड्या गाड्या घेऊन येतात.
advertisement
7/8
शोभा डे यांनी त्यांचा वैयक्तिक अनुभव सांगताना म्हटले, "मी तिथे खाणाऱ्या ७०० लोकांपैकी एकाही व्यक्तीला ओळखत नव्हते! मी शॉक्ड होते. ते सगळे तरुण होते आणि प्रत्येक टेबलवर ते महागड्या टकीलाच्या बाटल्या ऑर्डर करत होते. प्रत्येक टेबलाचे बिल लाखो रुपयांच्या घरात जात होते, पण हे सगळे लोक माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी होते."
advertisement
8/8
शिल्पा शेट्टीने २०१९ मध्ये 'बॅस्टियन' ब्रँडचे संस्थापक रणजीत बिंद्रा यांच्यासोबत भागीदारी केली. शिल्पा आता रेस्टॉरंटची सह-मालक असून यामध्ये तिचा ५०% वाटा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Shilpa Shetty : 60 कोटींच्या वादात अडकलेली शिल्पा शेट्टी एका रात्रीत कमावते 2 कोटी, 'बॅस्टियन'चं सिक्रेट आलं बाहेर