Rohit Sharma : शतक ठोकल्यानंतर रोहितच्या शिरपेचात मानाचा तुरा! मुंबईच्या राजाला ICC ने दिलं मोठं गिफ्ट
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Rohit Sharma ICC World Ranking : रोहित शर्मा आपल्या कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात येऊन वनडे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आयसीसी क्रमवारीत नंबर 1 फलंदाज बनला आहे. रोहित शर्माने आपल्याच संघाचा कॅप्टन शुभमन गिल याला मागं टाकलं.
advertisement
1/7

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा हिटमॅन म्हणजेच रोहित शर्मा याने खळखणीत शतक ठोकलं होतं. याची दखल आता आयसीसीने देखील घेतली आहे.
advertisement
2/7
रोहित शर्मा आपल्या कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात येऊन वनडे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आयसीसी क्रमवारीत नंबर 1 फलंदाज बनला आहे. रोहित शर्माने आपल्याच संघाचा कॅप्टन शुभमन गिल याला मागं टाकलं.
advertisement
3/7
शुभमन गिलकडून रोहित शर्माने हे स्थान हिसकावून घेतले असून, गिल आता थेट तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे, तर रोहित तिसऱ्या स्थानावरून थेट पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
advertisement
4/7
ऑस्ट्रेलिया सिरीजनंतर आयसीसी वनडे क्रमवारीत रोहित शर्माचे रेटिंग पॉइंट्स 781 झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर अफगाणिस्तानचा इब्राहिम जादरान आहे, ज्याच्या खात्यात 764 रेटिंग पॉइंट्स आहेत.
advertisement
5/7
शुभमन गिलसाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची सिरीज चांगली राहिली नव्हती. याच कारणामुळे त्याला आयसीसी क्रमवारीत नुकसान झाले आहे. गिलच्या खात्यात आता 745 रेटिंग पॉइंट्स आहेत.
advertisement
6/7
तर चौथ्या स्थानी पाकिस्तानचा बाबर आझम (739 रेटिंग पॉइंट्स) आहे. महत्त्वाचे म्हणजे, विराट कोहली टॉप-5 मधून बाहेर गेला असून, तो आता 725 पॉइंट्ससह सहाव्या स्थानी पोहोचला आहे.
advertisement
7/7
दरम्यान, रोहित शर्मासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अखेरचा सामना सिडनीमध्ये होता. या सामन्यात रोहित शर्माने आपल्या जीवाची बाजी लावली आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : शतक ठोकल्यानंतर रोहितच्या शिरपेचात मानाचा तुरा! मुंबईच्या राजाला ICC ने दिलं मोठं गिफ्ट