Rohit Sharma : रोहित सेफ, पण गंभीरचं टेन्शन वाढलं; टीम इंडियाच्या 4 खेळाडूंचे करिअर संकटात!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमधून रोहित शर्माने 7 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक केलं. 3 मॅचच्या या सीरिजमध्ये रोहितने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावलं, याचसोबत त्याने टीकाकारांची बोलतीही बंद केली आहे.
advertisement
1/7

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजआधी रोहित शर्माची कॅप्टन्सी काढून घेण्यात आली. 2027 वर्ल्ड कपची टीम तयार करण्यासाठी शुभमन गिलला वनडे टीमचं नेतृत्व देण्यात आलं. तेव्हापासून रोहित 2027 चा वर्ल्ड कप खेळणार का नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं.
advertisement
2/7
रोहित शर्माने आपल्याला 2027 चा वनडे वर्ल्ड कप खेळायचा असल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे, पण तोपर्यंत रोहित 40 वर्षांचा होणार आहे. निवड समिती प्रमुख अजित आगरकर आणि कोच गौतम गंभीर यांनाही रोहित 2027 वर्ल्ड कप खेळणार का? याबाबत प्रश्न विचारण्यात आले, पण दोघांनीही या प्रश्नावर थेट उत्तर देणं टाळलं.
advertisement
3/7
आता रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एक शतक आणि एक अर्धशतक करून 2027 वर्ल्ड कपसाठी आपण तयार असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. रोहित शर्माच्या या खेळीमुळे आता भारताच्या 4 खेळाडूंचा कमबॅकचा मार्ग कठीण झाला आहे.
advertisement
4/7
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी यशस्वी जयस्वाल हा टीम इंडियाचा तिसरा ओपनर होता. यशस्वी जयस्वालकडे रोहितनंतरचा पुढचा ओपनर म्हणून पाहिलं जात आहे, पण आता रोहितच्या या फॉर्ममुळे जयस्वालला आणखी काही काळ बेंचवरच बसावं लागण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
संजू सॅमसनकडेही भारताच्या वनडे टीममधील ओपनिंगचा पर्याय म्हणून पाहिलं जात आहे. संजूने आतापर्यंत 16 वनडे सामन्यांमध्ये 56.67 च्या सरासरीने आणि 99.61 च्या स्ट्राईक रेटने 510 रन केल्या आहेत. संजूच्या नावावर वनडेमध्ये एक शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.
advertisement
6/7
ऋतुराज गायकवाडही मागच्या काही काळापासून टीम इंडियामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहे, पण इतकी तीव्र स्पर्धा असल्यामुळे ऋतुराजला खेळण्याची संधी मिळत नाहीये. ऋतुराजने भारताकडून 6 वनडे खेळल्या, ज्यात त्याने 19.17 च्या सरासरीने 115 रन केल्या, यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. ऋतुराजला वनडेमध्ये स्वत:ला सिद्ध करता आलं नसलं, तरी त्याची क्षमता अनेकांनी आयपीएलमध्ये पाहिली आहे.
advertisement
7/7
देवदत्त पडिक्कल याला अजून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली नाही, पण तो स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करत आहे. पडिक्कल त्याच्या या कामगिरीमुळे टीम इंडियाचा दरवाजा वारंवार ठोठावत आहे, पण ओपनर असलेल्या पडिक्कलची निवड करायची असेल, तर त्याला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? असा प्रश्न निवड समितीसमोर आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : रोहित सेफ, पण गंभीरचं टेन्शन वाढलं; टीम इंडियाच्या 4 खेळाडूंचे करिअर संकटात!