रुपयाचं नाणं, किट बॅग अन् सचिनला घडवणारे 3 हात, मास्टरब्लास्टरची भावुक पोस्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
प्रवासाची सुरुवात एका नाण्याने, खांद्यावर घेतलेल्या किटबॅगने आणि तीन हातांच्या मार्गदर्शनाने झाली. बाबा, आचरेकर सर आणि अजित असं कॅप्शन सचिननं या फोटोंना दिलं आहे.
advertisement
1/6

प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक व्यक्ती असतो जो त्याचं आयुष्य बदलून टाकतो. कुणी एका टप्प्यावर भेटतं तर प्रत्येक टप्प्यात भेटणारे वेगवेगळे लोकही असतात. या सगळ्यांचे आभार आणि आशीर्वाद सदैव सोबत राहावेत यासाठी आज शिक्षक दिनानिमित्ताने प्रत्येकजण आपल्या भावना व्यक्त करत आहे. त्यात मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरही मागे नाही.
advertisement
2/6

सचिनने आज इन्टावर तीन फोटो पोस्ट केले आणि त्यावर कॅप्शन लिहीत भावुक झाला. त्याचे हे तीन फोटो फक्त फोटो नव्हते तर आजवरच्या कारकीर्दीतील आठवणींना उजाळा आणि त्याला घडवणारे महत्त्वाचे तीन स्तंभ म्हणायला हवेत.
advertisement
3/6
सचिनच्या आयुष्यात या तीन व्यक्तींचं महत्त्वाचं योगदान होत आणि आजही कायम राहील असं तो म्हणतो. खेळाडू ते मास्टरब्लास्टर, क्रिकेटचा देव ही ओळख निर्माण करण्यापर्यंतच्या प्रवासात या तीन व्यक्तींचा त्यांच्या हातांचा महत्त्वाचा वाटा होता.
advertisement
4/6
प्रवासाची सुरुवात एका नाण्याने, खांद्यावर घेतलेल्या किटबॅगने आणि तीन हातांच्या मार्गदर्शनाने झाली. बाबा, आचरेकर सर आणि अजित असं कॅप्शन सचिननं या फोटोंना दिलं आहे. क्रिकेटसारख्या कठीण प्रवासात यशस्वी होण्यासाठी यांचं किती मोठं योगदान आहे आज त्याच्या चाहत्यांना समजलं असेल.
advertisement
5/6
शाळेच्या मैदानात किटबॅग घेऊन गेलेल्या पावलांना त्या वेळी दिशा दाखवणारे तीन हात आयुष्यभराची सोबत ठरले. वडिलांचे पाठबळ, आचरेकर सरांचे कसलेले प्रशिक्षण आणि भावाचं अखंड प्रोत्साहन-मार्गदर्शन या तिन्हींच्या आधारे प्रत्येक अडथळा पार करत यशाचा झेंडा उभारता आला.
advertisement
6/6
हा प्रवास फक्त क्रिकेटचा नव्हता, तर आयुष्याच्या प्रत्येक क्षणी मिळालेल्या शिकवणीचा होता. छोट्या चुका सुधारायला शिकवलं, मोठ्या स्वप्नांना गवसणी घालायला बळ दिलं. जेव्हा मैदानावर प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर झाला, तेव्हा त्या टाळ्यांच्या आवाजात या तीन व्यक्तींचं योगदान दडलेलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
रुपयाचं नाणं, किट बॅग अन् सचिनला घडवणारे 3 हात, मास्टरब्लास्टरची भावुक पोस्ट