15 चेंडूत बॉलरच्या चिधड्या उडवल्या, सरफराजचा निवड समितीच्या डोळ्यात खुपेल असा रेकॉर्ड, 310 च्या स्ट्राईक रेटने चोपलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाचा स्टार खेळाडू सरफराज खान मागच्या अनेक वर्षापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतो आहे.तरी देखील निवड समितीकडून त्याची निवडच होत नाही आहे.
advertisement
1/8

टीम इंडियाचा स्टार खेळाडू सरफराज खान मागच्या अनेक वर्षापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतो आहे.तरी देखील निवड समितीकडून त्याची निवडच होत नाही आहे.
advertisement
2/8
त्यामुळे धावा करूनही निवड होत नसल्याने वैतागलेल्या सरफराज खानने आता निवड समीतीच्या डोळ्यात खुपेल असा रेकॉर्ड केला आहे. हा रेकॉर्ड नेमका काय आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
3/8
खरं तर पंजाबने मुंबईसमोर 216 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना सरफराज खानने 15 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं होतं.
advertisement
4/8
विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासातल हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे.त्यामुळे विजय हजारेत सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारा सरफराज खान हा पहिला खेळाडू ठरला आहे.
advertisement
5/8
याआधी बडोद्याच्या अतीत सेठने 2020-21 हंगामात 16 चेंडूत अर्धशतक केले होते. सरफराजचा हा विक्रम लिस्ट ए क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजाचा सर्वात वेगवान अर्धशतकाचा देखील आहे.
advertisement
6/8
त्यामुळे एक तर धावा काढून संघात निवड होत नाही आहेत त्यात आता सरफराजचा हा विक्रम निवड समीतीच्या डोळ्यात खुपणार आहे.
advertisement
7/8
दरम्यान या सामन्यात सरफराजने 20 बॉलमध्ये 60 धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने 5 षटकार आणि 7 चौकार लगावले होते. यावेळी त्याचा स्ट्राईक रेटने 310 होता.
advertisement
8/8
सरफराजने इतक्या वेगवान धावा काढून सामना विजयाच्या नजीक आणला होता. पण मुंबईचे इतर खेळाडू अवघी 1 धावा काढू न शकल्याने पंजाब विजयी झाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
15 चेंडूत बॉलरच्या चिधड्या उडवल्या, सरफराजचा निवड समितीच्या डोळ्यात खुपेल असा रेकॉर्ड, 310 च्या स्ट्राईक रेटने चोपलं