3 तास 10 मिनिटांची नवीन हॉरर-कॉमेडी फिल्म, रिलीजच्या पहिल्याच दिवशी घातलाय धुमाकूळ, करतेय रेकॉर्डब्रेक कमाई
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Horror Comedy Film : बॉक्स ऑफिसवर 3 तास 10 मिनिटांची एक नवीन हॉरर-कॉमेडी फिल्म धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या फिल्मने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.
advertisement
1/7

पॅन-इंडिया सुपरस्टार प्रभास (Prabhas) सध्या बहुप्रतीक्षित 'द राजा साहब' (The Raja Saab) या फिल्ममुळे चर्चेत आहे. ही एक रोमँटिक, हॉरर-कॉमेडी फिल्म आहे. या 3 तास 10 मिनिटांच्या फिल्मचा बॉक्स ऑफिसवर चांगलाच बोलबाला पाहायला मिळत आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या फिल्मने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.
advertisement
2/7
'द राजा साहब' या फिल्ममध्ये प्रभास राजा साहबच्या भूमिकेत आहे. तर संजय दत्त एका दमदार आणि भयावह रुपात पाहायला मिळत आहे. अभिनेत्री मालविका मोहनने या फिल्मच्या माध्यमातून तेलुगूमध्ये पदार्पण केलं आहे. या फिल्ममध्ये निधी अग्रवाल आणि रिद्धी कुमार, बोमन ईरानी, जरीना वहाब हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
advertisement
3/7
'द राजा साहब' या फिल्मच्या दिग्दर्शनाची धुरा मारुती दासारी यांनी सांभाळली आहे. तर U/A 16+ सर्टिफिकेटदेखील या फिल्मला मिळालं आहे. टीजी विश्व प्रसाद यांनी या फिल्मची निर्मिती केली आहे.
advertisement
4/7
'द राजा साहब' ही फिल्म 9 जानेवारी 2026 रोजी तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये रिलीज झाली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या पहिल्याच दिवशी ग्लोबल प्री-सेल्समध्ये या फिल्मने 50 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. विशेष म्हणजे जपानमध्येही ही फिल्म रिलीज होत आहे.
advertisement
5/7
'द राजा साहब' या फिल्मला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. तमिळ प्रेक्षकांना ही कौटुंबिक फिल्म जास्त आवडत आहे. एकंदरीत ही फिल्म सुरुवातीपासून प्रेक्षकांना बांधून ठेवत आहे. या फिल्मची सुरुवातच 'महिलाएं देवदूत होती हैं' अशा दमदार डायलॉगने होते.
advertisement
6/7
'द राजा साहब' या फिल्मची कथा एका तरुण राजघराण्यातील मुलाच्या अवतीभोवती फिरते. जो आपल्या आजोबांच्या जुन्या, रहस्यमय हवेलीतून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण त्या हवेलीत दडलेल्या अलौकिक रहस्यांचा आणि भूतकाळातील गोष्टींचा सामना करतो, ज्यात त्याची आजी आणि आजोबांच्या हरवलेल्या नात्याचाही समावेश आहे. ही कथा एका बाजूला भूतकाळातील रहस्ये उलगडते, तर दुसरीकडे प्रभासचे पात्र त्याच्या शाही वारसा आणि बंडखोर स्वभावाचा स्वीकार करून सत्तेवर येते.
advertisement
7/7
'द राजा साहब' या फिल्ममध्ये हॉरर आणि फँटसी जॉनर दाखवण्यात आला आहे. या फिल्ममध्ये एका जुन्या हवेलीचे रहस्य आणि त्यात दडलेल्या अलौकिक गोष्टी दाखवल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
3 तास 10 मिनिटांची नवीन हॉरर-कॉमेडी फिल्म, रिलीजच्या पहिल्याच दिवशी घातलाय धुमाकूळ, करतेय रेकॉर्डब्रेक कमाई