TRENDING:

Rajasthan Royals : एक निर्णय अन् 4500000000 रूपये खिशात, IPL चा दिग्गज खेळाडू कसा झाला मालामाल?

Last Updated:
तुम्हाला प्रश्न पडला असेल ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नच तर निधन झालं आहे, मग तो अचानक मालामाल कसा झाला? हे जाणून घेऊयात.
advertisement
1/7
एक निर्णय अन् 4500000000 रूपये खिशात, IPL चा दिग्गज खेळाडू कसा झाला मालामाल?
आयपीएल 2026 च्या हंगाम सूरू व्हायला तीन दिवसांचा कालावधी उरला आहे.असे असतानाच राजस्थान रॉयल्सची 15300 कोटी तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाची 16700 कोटी रूपयांना विक्री झाली आहे.त्यामुळे या दोन्ही संघाना आता नवा मालक मिळाला आहे.
advertisement
2/7
राजस्थान रॉयल्स संघाला अमेरीकेच्या काल सोमानी यांच्या नेतृत्वातील कंर्सोटीयमने 1.63 अरब डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 15,290 कोटी रूपयांना खरेदी केले आहे. या खरेदी विक्रीत जून्या आणि नवीन मालकांना फायदा झाला असेल.
advertisement
3/7
या सर्वात एक खेळाडू असा देखील जो मालामाल झाला आहे. या खेळाडूचे नाव शेन वॉर्न आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नच तर निधन झालं आहे, मग तो अचानक मालामाल कसा झाला? हे जाणून घेऊयात.
advertisement
4/7
आयपीएलच्या 2008 सालच्या पहिल्याच हंगामात शेन वॉर्नच्या नेतृ्त्वात राजस्थान रॉयल्सने ट्रॉफी जिंकली होती.त्यानंतर आतापर्यंत पुन्हा एकदा राजस्थानला ट्रॉफीवर नाव कोरता आले नाही आहे.
advertisement
5/7
शेन वॉर्नने राजस्थान रॉयल्ससाठी चार सीझन खेळले होते. यामध्ये प्रत्येक सीझनला त्याला 9.35 करोड रूपयांचा त्याला पगार मिळाला. यासोबत शेन वॉर्नने राजस्थान रॉयल्सकडे त्यावेळी एक मोठी मागणी केली होती. शेन वॉर्नने राजस्थानकडे इक्विटी (मालकी हक्क) मागितला होता.
advertisement
6/7
शेन वॉर्नने एकूण 4 सीझन खेळल्यामुळे त्याला 0.75 च्या हिशोबाने 3 टक्के झाली. आता 15,290 कोटी रूपयांपैकी 3 टक्क्यांच्या हिशोबाने त्याच्या वाट्याला 450 करोड रूपये आले होते. आता शेन वॉर्न हयात नसल्याने ही रक्कम त्याच्या कुटुंबियांना मिळणार आहे.
advertisement
7/7
दरम्यान शेन वॉर्नने त्यावेळी घेतलेल्या या निर्णयाचा फायदा आता त्याच्या कुटुंबियांना झाला आहे.शेन वॉर्नने आयपीएलचे 55 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 57 विकेट घेतले होते. 2008 ते 2011 अशी त्याची आयपीएल कारकिर्द होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Rajasthan Royals : एक निर्णय अन् 4500000000 रूपये खिशात, IPL चा दिग्गज खेळाडू कसा झाला मालामाल?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल