श्रेयस अय्यरच खतरनाक कमबॅक, 13 बॉलमध्ये 58 धावांची वादळी खेळी,आता न्यूझीलंडच्या गोलंदाजांची पिसं काढणार
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर याची न्यूझीलंड विरूद्ध सामन्यासाठी भारतीय संघात निवड झाली होती. पण श्रेयसच्या फिटनेवस त्याची प्लेइंग इलेव्हनमधील निवड अपेक्षित होती.
advertisement
1/7

टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर याची न्यूझीलंड विरूद्ध सामन्यासाठी भारतीय संघात निवड झाली होती. पण श्रेयसच्या फिटनेवस त्याची प्लेइंग इलेव्हनमधील निवड अपेक्षित होती.
advertisement
2/7
असे असताना श्रेयस अय्यरला आज मुंबईकडून विजय हजारे ट्रॉफी खेळण्याची संधी मिळाली. आणि त्याने या संधीच सोन करत फिटनेस टेस्ट पास करून दाखवली आहे.
advertisement
3/7
श्रेयस अय्यरने हिमाचल प्रदेश विरूद्ध खेळताना 53 बॉलमध्ये 82 धावांची खेळी केली आहे. या खेळीत त्याने 10 चौकार आणि तीन षटकार मारले आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 154 होता.
advertisement
4/7
श्रेयस व्यतिरिक्त मुशीर खानने 51 बॉलमध्ये 73 धावांची खेळी केली होती. या दोघांच्या वादळी खेळीच्या बळावर मुंबईने 9 विकेट गमावून 299 धावा केल्या होत्या.
advertisement
5/7
खरं तर ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध दौऱ्यात त्याला फिल्डिंग करताना बरगड्याजवळ दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला तीन महिन्यापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर रहावे लागले होते.
advertisement
6/7
पण आता तो फिट झाला होता आणि त्याला न्युझीलंड विरूद्ध वनडे मालिकेसाठी निवड झाली होती. पण श्रेयस फिटनेस टेस्ट पास झाला नव्हता. पण आता विजय हजारे ट्रॉफीमधली त्याची फलंदाजी पाहुन तो एकदम तंदरूस्त असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच आता त्याची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड होण्याची देखील शक्यता आहे.
advertisement
7/7
भारताचा एकदिवसीय संघ : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, के एल राहुल (विकेटकिपर), श्रेयस अय्यर (उप कर्णधार), वॉशिग्टन सुंदर, रविंद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, रिषभ पंत (विकेटकिपर) नितीश कुमार रेड्डी, अर्शदिप सिंह, यशस्वी जयस्वाल
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
श्रेयस अय्यरच खतरनाक कमबॅक, 13 बॉलमध्ये 58 धावांची वादळी खेळी,आता न्यूझीलंडच्या गोलंदाजांची पिसं काढणार