Mumbai: कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान लोकलला भयानक आग, घटनास्थळाचे 10 PHOTOS
- Published by:Sachin S
Last Updated:
मुंबईतील कुर्ला आणि विद्याविहार रेल्वे स्थानक परिसरात एका लोकलला आग लागल्याची घटना समोर आली आहे. कचरा वाहून नेणाऱ्या या लोकलला ही आग लागली होती.
advertisement
1/9

मुंबईतील कुर्ला आणि विद्याविहार रेल्वे स्थानक परिसरात एका लोकलला आग लागल्याची घटना समोर आली आहे. कचरा वाहून नेणाऱ्या या लोकलला ही आग लागली होती. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.
advertisement
2/9
मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला आणि विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या दरम्यान मुख्य रेल्वे ट्रॅकच्या बाजूला दुसऱ्या ट्रॅकवर MUCK ट्रेन म्हणजे कचरा वाहून नेणारी लोकल उभी होती.
advertisement
3/9
संध्याकाळच्या सुमारास अचानक या लोकलला आग लागली. लोकलच्या समोरील मोटरमन जिथे बसतात त्या डब्ब्यात आग लागली होती. बघता बघता आगीने रौद्ररुपधारण केलं होतं.
advertisement
4/9
MUCK मक लोकल ट्रेनमध्ये मोठी आग लागली. आगीच्या ज्वाळा इतक्या भीषण होत्या की त्या दुरूनही दिसत होत्या. स्थानिक रहिवाशांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला.
advertisement
5/9
रेल्वे पोलीस आणि रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण आगीचा भडका इतका उडाला होता की, आग पसरत गेली.
advertisement
6/9
आग लागली होती त्यावेळी लोकल रिकामी होती, त्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झालं नाही. पण, आगीमुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. ज्यामुळे अनेक गाड्या थांबाव्या लागल्या.
advertisement
7/9
अग्निशमन दलाच्या जवानांसह स्थानिक रहिवाशांनी आग विझवण्यास मदत केली. सुरक्षेच्या कारणास्तव, रेल्वे प्रशासनाने घाटकोपर आणि सायन स्थानकांदरम्यानच्या ओव्हरहेड वायर्सचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित केला होता.
advertisement
8/9
आग आटोक्यात आणण्यास अग्निशामक दलाला अखेरीस यश आलं. त्यानंतर रेल्वे सेवा पुन्हा पूर्ववत करण्याात आली.
advertisement
9/9
पण, या लोकलला कुणी आग लावली, आग लागली की लावली, याबद्दल रेल्वे पोलीस तपास करत आहे. आगीच्या घटनेमुळे मध्य रेल्वेवर लोकलचं वेळापत्रक कोलमडलं होतं. त्यामुळे ऐन संध्याकाळी घरी जाणाऱ्या नोकरदारांना नाहक फटका बसला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai: कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान लोकलला भयानक आग, घटनास्थळाचे 10 PHOTOS