कमावत्या बायकोला नवऱ्याने पोटगी द्यायची की नाही? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
- Published by:Priya Lad
Last Updated:
Husband Wife In Court : पतीने पतीला देण्याच्या पोटगीबाबत फॅमिली कोर्टाने निकाल दिला, या निकालाविरोधात महिलेने हायकोर्टात धाव घेतली आणि कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे.
advertisement
1/5

लग्नानंतर पती-पत्नीत खर्चावरून सतत वाद होत असतात. त्यात पती-पत्नी वेगळे राहत असतील. तर पत्नीला पतीकडून मिळणाऱ्या खर्चावरूनही भांडणं होतात. असंच एक प्रकरण. ज्यात पत्नीने पतीने दिलेल्या तुटपुंज्या पोटगीविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. यावर दिल्ली हायकोर्टाने महत्त्वाचा निकाल दिला आहे.
advertisement
2/5
माहितीनुसार 2021 साली लग्न झालेलं हे कपल. हुड्यांच्या वादातून सासरच्यांनी 2022 साली घरातून बाहेर काढल्याचा आरोप पत्नीने केला आहे. आपला काही कमाईचा स्रोत नाही हे सांगून पत्नीने पतीकडे पोटगीची मागणी केली. हे प्रकरण कोर्टात गेलं. फॅमिली कोर्टाने पतीने पत्नीला महिन्याला 2500 रुपये पोटगीची हंगामी रक्कम देण्याचा निकाल दिला. पण एवढीशी पोटगीची रक्कम मिळाल्याने महिलेने दिल्ली हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला.
advertisement
3/5
पत्नीने दावा केला की तिचा नवरा ग्रॅज्युएट असून तो खासगी शाळेत शिक्षक आहे, त्याला महिन्याला 25 हजार रुपये पगार आहे. शिवाय प्रायव्हेट ट्युशनचे 15 हजार रुपये, दुकान आणि भाड्यातून 30 हजार रुपये अशी त्याची अतिरिक्त कमाई आहे. त्या तुलनेत त्याने पोटगी म्हणून दिलेली 2500 रुपये रक्कम खूप कमी आहे.
advertisement
4/5
यावर पतीने सांगितलं की त्याची पत्नीही एका एनजीओमध्ये शिक्षिका आहे, जिला 10 हजार रुपये पगार आहे. जो कमीत कमी पगारापेक्षाही खूप कमी असल्याचं कोर्टाने म्हटलं. तसंच पतीने पूर्ण बँक स्टेटमेंटही दिलेलं नाही, जे दिलं त्यात तिच्या पगाराबाबत कोणतंच ट्रान्झॅक्शन नाही. कोर्टाने पत्नी अकरावी शिकल्याचा हवाला देत पुराव्याशिवाय पतीचा दावा काहीच कामाचा नाही. शिवाय पोटगीची हंगामी रक्कम देताना पत्नी कमावते, ती स्वतःला सांभाळू शकते, हे मानणं योग्य नाही.
advertisement
5/5
पत्नीकडे कोणतेही स्वतंत्र इनकम नाही, दोन्ही पक्षांची स्थिती आणि पतीचा कमाईचा आकडा पाहता जुनी पोटगी खूप कमी आहे. यानंतर कोर्टाने पोटगीची रक्कम वाढवून 3500 रुपये केली आहे. तसंच 3 महिन्यांत देण्याचे आदेशही दिले आहेत, असं वृत्त लेटेस्ट लॉ वेबसाईटने दिलं आहे. (सर्व फोटो प्रतीकात्मक/AI Generated)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
कमावत्या बायकोला नवऱ्याने पोटगी द्यायची की नाही? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय