BCCI Awards : वर्ल्ड कपमध्ये जागा नाही, तरी बनला 'क्रिकेटर ऑफ द ईयर',कोण आहे टीम इंडियाचा खेळाडू?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाच्या या विजयात संजू सॅमसनसह ईशान किशन, शिवम दुबे आणि जसप्रीत बुमराह यांनी मोलाची भूमिका बजावली होती.त्यामुळे या खेळाडूंची कामगिरी पाहता बीसीसीआयकडून या खेळाडूंचा गौंरव होईल अशी अपेक्षा होती.
advertisement
1/9

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI)चा 15 मार्च 2026 रोजी वार्षिक पुरस्कार सोहळा हा दिल्ली येथे पार पडणार आहे. 2025-26 वर्षाचा हा सोहळा असणार आहे.
advertisement
2/9
या सोहळ्याआधी टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप जिंकला होता.न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत टीम इंडियाने वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं.
advertisement
3/9
टीम इंडियाच्या या विजयात संजू सॅमसनसह ईशान किशन, शिवम दुबे आणि जसप्रीत बुमराह यांनी मोलाची भूमिका बजावली होती.
advertisement
4/9
त्यामुळे या खेळाडूंची कामगिरी पाहता बीसीसीआयकडून या खेळाडूंचा गौंरव होईल अशी अपेक्षा होती. पण टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघात नसलेल्या खेळाडूचा गौरव होणार आहे.
advertisement
5/9
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून टीम इंडियाचा वनडे आणि टेस्टचा कर्णधार शुभमम गिल आहे. शुभमन गिलला यंदाच्या वर्षी 'क्रिकेटर ऑफ द ईयर'चा पुरस्कार मिळणार आहे.
advertisement
6/9
कारण शुभमन गिलने 2025 या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली होती. तो या वर्षातला सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला होता.
advertisement
7/9
शुभमन गिलने 35 सामन्यातील 42 डावात 7 शतकांसह 1764 धावा केल्या होत्या. टेस्टमध्ये त्याने 983 धावा, यातील 754धावा त्याने इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेत केल्या होत्या. तर चॅंम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याने 188 धावा केल्या होत्या. वनडेमध्ये 490 धावा केल्या होत्या.
advertisement
8/9
वर्ल्ड कपआधी टी20 संघात त्याचा समावेश होता.पण त्याच्या बॅटॅीतून धावाचा निघत नसल्याने शुभमन गिलच्या जागी संजू सॅमसनची निवड झाली होती. पण वनडे आणि टेस्ट सामन्यातील कामगिरीच्या बळावर त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे.
advertisement
9/9
विशेष म्हणजे या पुरस्कार सोहळ्यात टीम इंडियाचा माजी मुख्य कोच राहुल द्रविड याला सीके नायडू लाईफटाईम अचिवमेंट अवॉर्डही देण्यात येणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
BCCI Awards : वर्ल्ड कपमध्ये जागा नाही, तरी बनला 'क्रिकेटर ऑफ द ईयर',कोण आहे टीम इंडियाचा खेळाडू?