TRENDING:

T20 World Cup : ऑस्ट्रेलियाची एक्झिट, 'नॉक आऊट'मध्ये टीम इंडियाचे 3 सामने कुणाविरुद्ध, कुठे? पूर्ण शेड्यूल

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपची ग्रुप स्टेज आता निर्णायक वळणावर पोहोचली आहे. सुपर-8 स्टेजमध्ये 8 पैकी एकूण 7 टीम क्वालिफाय झाल्या आहेत. तर पाकिस्तान पुढच्या राऊंडला पोहोचणार का नाही? याचा सस्पेन्स कायम आहे.
advertisement
1/7
ऑस्ट्रेलियाची एक्झिट, 'नॉक आऊट'मध्ये टीम इंडियाचे 3 सामने कुणाविरुद्ध, कुठे?
सुपर-8 मध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला नामिबियाविरुद्धचा त्यांचा सामना जिंकावाच लागणार आहे, अन्यथा युएसए सुपर-8 मध्ये पोहोचेल. या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला तर युएसए सुपर-8 मध्ये प्रवेश करणारी शेवटची टीम ठरेल.
advertisement
2/7
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचं आव्हान या वर्ल्ड कपमध्ये संपुष्टात आलं आहे. झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांचातला सामना पावसामुळे रद्द झाल्याने ऑस्ट्रेलियाचा यंदाच्या वर्ल्ड कपमधला प्रवास ग्रुप स्टेजलाच संपुष्टात आला आहे.
advertisement
3/7
स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा ओमानविरुद्धचा सामना शिल्लक आहे, पण हा सामना जिंकूनही ऑस्ट्रेलिया ग्रुप बी मध्ये झिम्बाब्वे आणि श्रीलंकेला मागे टाकू शकत नाही, त्यामुळे ओमानविरुद्धच्या ऑस्ट्रेलियाच्या सामन्याला कोणताही अर्थ उरलेला नाही.
advertisement
4/7
ग्रुप ए मधून टीम इंडिया सुपर-8 मध्ये पोहोचली आहे, तर पाकिस्तान किंवा युएसए यांच्यातली एक टीम प्रवेश करेल. ग्रुप बी मधून श्रीलंका, झिम्बाब्वे, ग्रुप सी मधून वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि ग्रुप डी मधून दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड सुपर-8 मध्ये क्वालिफाय झाल्या आहेत.
advertisement
5/7
सुपर-8 मध्ये 8 टीमना 4-4 च्या ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. ज्यात टीम इंडियाच्या ग्रुपमध्ये झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज यांचा समावेश आहे. याचसोबत टीम इंडियाच्या सुपर-8 च्या सामन्यांचं चित्रही स्पष्ट झालं आहे.
advertisement
6/7
रविवार 22 फेब्रुवारीला टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुपर-8 चा पहिला सामना खेळेल. त्यानंतर 26 फेब्रुवारीला टीम इंडियाचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध आणि 1 मार्चला शेवटचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध होईल. सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी टीम इंडियाला कमीत कमी 2 मॅच जिंकाव्या लागणार आहेत.
advertisement
7/7
सुपर-8 च्या दोन ग्रुपमधल्या सर्वाधिक पॉईंट्स मिळवलेल्या 2-2 टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील. सेमी फायनलमध्ये जिंकलेल्या 2 टीमचा 8 मार्चला टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये महामुकाबला होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : ऑस्ट्रेलियाची एक्झिट, 'नॉक आऊट'मध्ये टीम इंडियाचे 3 सामने कुणाविरुद्ध, कुठे? पूर्ण शेड्यूल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल