TRENDING:

सूर्याबद्दलचं वक्तव्य भोवलं... अभिनेत्री पुरती अडकली, कॅप्टनच्या जवळच्या व्यक्तीची मोठी ऍक्शन!

Last Updated:
टीम इंडियाचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव याच्याबद्दल केलेलं वक्तव्य अभिनेत्रीला चांगलंच भोवलं आहे. या अभिनेत्रीविरोधात सूर्यकुमार यादवच्या जवळच्या व्यक्तीने कारवाई केली आहे.
advertisement
1/6
सूर्याबद्दलचं वक्तव्य भोवलं, अभिनेत्री पुरती अडकली, जवळच्या व्यक्तीची मोठी ऍक्शन
अभिनेत्री खुशी मुखर्जीने काही दिवसांपूर्वी टीम इंडियाच्या टी-20 टीमचा कर्णधार सूर्यकुमार यादववर खळबळजनक आरोप केले होते, या आरोपांवरून आता खुशी मुखर्जी चांगलीच अडचणीत आली आहे.
advertisement
2/6
सूर्यकुमार यादवबद्दल केलेलं वक्तव्य खुशी मुखर्जीला भोवली आहे. खुशी मुखर्जीविरोधात सूर्यकुमार यादवच्या जवळच्या व्यक्तीने अब्रू नुकसानीचा दावा केला आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये खुशीविरोधात 100 कोटींचा मानहानीचा दावा ठोकण्यात आला आहे.
advertisement
3/6
फैजान अन्सारी नावाच्या व्यक्तीने ही तक्रार दाखल केली आहे. फैजान अन्सारी हा सूर्यकुमार यादव याचा शेजारी आहे. खुशीने सूर्यकुमार यादववर वाईट हेतूने आरोप केले आहेत. सूर्यकुमार यादवच्या प्रतिष्ठेला या आरोपामुळे नुकसान पोहोचलं आहे, त्यामुळे तिला ताबडतोब अटक करण्यात यावी. अशी मागणी फैजानने गाझीपूरचे एसपी डॉ. इराज राजा यांच्याकडे केली आहे.
advertisement
4/6
फैजानने केलेली ही तक्रार सूर्यकुमार यादवच्या सांगण्यावरून करण्यात आली आहे का? याबाबत अजून कोणतीही स्पष्टता आलेली नाही. कारण या मुद्द्यावरून अजून सूर्यकुमार यादव किंवा खुशी मुखर्जीचं स्पष्टीकरण आलेलं नाही.
advertisement
5/6
एका कार्यक्रमात खुशीला कोणत्या क्रिकेटपटूला डेट करायला आवडेल? कोणता क्रिकेटपटू आवडतो? असं विचारण्यात आलं. तेव्हा तिने मी कोणत्याही क्रिकेटपटूला डेट करणार नाही. असं उत्तर दिलं.
advertisement
6/6
यानंतर तिने अनेक क्रिकेटपटू माझ्या मागे होते. सूर्यकुमार यादव मला खूप मेसेज करायचा, पण आता आमच्यात फारशी चर्चा होत नाही, असं खुशी म्हणाली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
सूर्याबद्दलचं वक्तव्य भोवलं... अभिनेत्री पुरती अडकली, कॅप्टनच्या जवळच्या व्यक्तीची मोठी ऍक्शन!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल