Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीचा थेट तेंडुलकरशी पंगा, अर्जुनला 300च्या स्ट्राईक रेटने चोपलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाचा स्टार युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी सध्या प्रचंड फॉर्ममध्ये आहे. आज त्याने सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकरला त्याच्या गोलंदाजीवर धू धू धुतलं होतं.
advertisement
1/7

टीम इंडियाचा स्टार युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी सध्या प्रचंड फॉर्ममध्ये आहे. आज त्याने सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकरला त्याच्या गोलंदाजीवर धू धू धुतलं होतं.
advertisement
2/7
सय्यर मुश्ताक अली स्पर्धेत दोन्ही खेळाडू आमने सामने आले होते.यावेळी बिहारकडून खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशीने 25 बॉलमध्ये 46 धावांची वादळी खेळी केली होती. या खेळीत त्याने 4 षटकार आणि 4 चौकार मारले होते. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेटने 184 होता.
advertisement
3/7
विशेष वैभव सूर्यवंशीने 46 धावांपैकी 15 धावा या अर्जुन तेंडुलकर विरोधात काढल्या होत्या. विशेष म्हणजे या धावा त्याने फक्त 5 बॉलमध्ये काढल्या होत्या.यामध्ये त्याने एक चौकार आणि षटकार मारला होता. त्यामुळे वैभवने 300 च्या स्ट्राईक रेटने त्याला चोपलं होतं.
advertisement
4/7
वैभव सूर्यवंशीसोबत कर्णधार साकीबुल गणीने 60 धावांचील आणि आकाश राजने 40 धावांची खेळी केली होता.या बळावर बिहारने 7 विकेट गमावून 180 धावा केल्या होत्या.
advertisement
5/7
या लक्ष्याचा पाठलाग करताना कश्यप बाखले आणि अर्जुन तेंडुलकर सलामीला उतरणार होता. माऱत्र अर्जून तेंडुलकर अपयशी ठरला आणि अवघ्या 5 धावा करून बाद झाला. अर्जून सोबत अभिनव तेजराणा शुन्यावर बाद झाला.
advertisement
6/7
लागोपाठ विकेट पडल्यानंतर कश्यप बाखले आणि सुयांश प्रभूदेसाईने गोव्याचा डाव सावरला आणि संघाला विजयानजीक पोहोचवलं होतं. कश्यपने 64 तर सुयशने 79 धावांची खेळी केली होती.
advertisement
7/7
यानंतर विकास सिंह आणि दर्शन मिसलने औपचारीक धावा काढून हा सामना 5 विकेटने जिंकला.अशाप्रकारे वैभव सुर्यवंशी वादळी खेळी करून देखील त्याचा संघ हारला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीचा थेट तेंडुलकरशी पंगा, अर्जुनला 300च्या स्ट्राईक रेटने चोपलं