अख्खं कुटुंब संपलं, कोरोनानं व्यवसाय बंद झाला, रस्त्यावर ट्रंपेट वाजवून फेडलं 15 लाखांचं कर्ज, कोण आहेत वसंत पवार?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
वसंत पवार यांनी कुटुंबातील दुःख, कोरोनानंतरचे आर्थिक संकट, लाखो रुपयांचे कर्ज यावर ट्रंपेटच्या कलेच्या आधाराने मात केली आणि 15 लाख कर्ज फेडले.
advertisement
1/7

मुंबई: आधी मुलगा नंतर नातू गमावला, आजारानं बायकोलाही नेलं, अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. कोरोनानं बिझनेस ठप्प झाला. डोक्यावर लाखो रुपयांचं कर्ज झालं. इतकं सगळं सोसलं पण कलेनं जगायला आधार दिला. कोरोनानंतर काम मिळेना त्यामुळे दारोदार फिरण्याची वेळ आली. मात्र त्यांची व्यथा पाहून ऐकून मदतीला लोक आली.
advertisement
2/7
कला माणसाला जगायला शिकवते, कठीण प्रसंगात तोंड द्यायला शिकवते. साताऱ्याच्या वाई तालुक्यातील शिरूर गावचे वसंत पवार हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. ज्याला ज्याला डिप्रेशन आलं, ताण आला, सगळं काही संपल्यासारखं वाटलं त्या प्रत्येकानं वसंत पवार यांच्या संघर्षाची कहाणी एकदा तरी वाचायला हवी. त्यांचा संघर्ष अक्षरश: शब्दात न सांगता येणारा आहे.
advertisement
3/7
वयाच्या 63 व्या वर्षी वसंत पवार हे रस्त्यावर ट्रंपेट वाजवत फिरतात. आपली कला सादर करुन त्यातून ते उदरनिर्वाह करत आहे. आतापर्यंत त्यांनी 15 लाख रुपयांचं कर्ज फेडलं आहे. आयुष्यात येणाऱ्या संकटांवर मात करत सुरांचा आधार घेऊन जगण्याचा मार्ग त्याने निवडला आहे.
advertisement
4/7
पूर्वी लग्नात-सणासुदीला किंवा सोहळ्यासाठी ट्रंपेट वाजवलं जायचं. कोरोनाच्या आधी त्यांचं बँजो पथक होतं. मात्र सगळं ठप्प झालं. गेल्या 40 वर्षांपासून ते ट्रंपेट वाजवत आहेत. आपली कला सादर करत आहेत. कधी पनवेल, पुणे, पुण्याच्या आसपासचा परिसर असं दिवसभर फिरून ते आपली कला सादर करुन त्यातून पैसे कमवतात.
advertisement
5/7
दोन वर्षे काम नसल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवलं. याच काळात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात देखील अनेक आघात झाले. नातवाचा अपघात झाल्याने त्याच्या उपचारासाठी 13 ते 14 लाख रुपये खर्च करावे लागले. काही काळातच मुलाचा अपघातात मृत्यू झाला. गरोदरपणात मुलगीही दगावली. कुटुंबाची जबाबदारी पुन्हा वसंत पवार यांच्या खांद्यावर आली.
advertisement
6/7
आजही वसंत पवार पुणे आणि मुंबईतील लग्नसमारंभ, वाढदिवस, धार्मिक कार्यक्रम इत्यादी ठिकाणी ट्रम्पेट वाजवतात. कार्यक्रम नसेल तर वारजे, गुडलक चौकाजवळच्या हॉटेलांसमोर बसून ट्रम्पेट वाजवतात. अंगातील कला पाहून कोल्हापूर येथील प्रशांत कुलकर्णी यांनी पवार यांना एक नवीन ट्रम्पेट भेट दिली. त्यामुळे त्यांचा उत्साह आणखी वाढला.
advertisement
7/7
आयुष्यातील कठीण प्रसंगांमध्येही त्यांनी ट्रम्पेटच्या सुरांना सोडलं नाही. तुम्हालाही वसंत पवार यांना मदत करायची असेल किंवा त्यांना काम देण्याची इच्छा असेल तर +91 97633 89828 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. मात्र हा नंबरचा गैरवापर होणार नाही याचीही खबरदारी घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Success Story/
अख्खं कुटुंब संपलं, कोरोनानं व्यवसाय बंद झाला, रस्त्यावर ट्रंपेट वाजवून फेडलं 15 लाखांचं कर्ज, कोण आहेत वसंत पवार?