TRENDING:

चित्त्यापेक्षा सुस्साट धावतात 'या' गाड्या; किंमत 10 लाखांहून कमी

Last Updated:
जेव्हा सर्वात भारी गाड्यांबाबत बाेललं जातं तेव्हा गाडीच्या दिसण्यासह तिचा परफाॅर्मन्सही पाहिला जाताे. काेणती गाडी किती वेगाने धावते याकडे विशेष लक्ष असतं. तर चला मग, भारतातल्या 10 लाख रुपयांच्या आतील सर्वात वेगवान गाड्यांवर एक नजर टाकूया. 
advertisement
1/7
चित्त्यापेक्षा सुस्साट धावतात 'या' गाड्या; किंमत 10 लाखांहून कमी
फ्रेंच कार निर्माता सिट्रोनची सी3 एसयूवी (Citroen C3) कार 14.32 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रतितास वेगाने धावते. यात 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असतं जे 110 बीएचपी पाॅवर जनरेट करतं.
advertisement
2/7
टोयोटा ग्लैंजा एमटी कार 13.54 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रतितास वेगाने धावते. यात मारुती कंपनीचं 1.2 लिटर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असतं. मारुतीने फ्राॅन्क्स गाड्यांमध्ये हे इंजिन वापरलं आहे.
advertisement
3/7
टाटा टियागो ईवी कार केवळ 13.43 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रतितास वेग पकडते. या इलेक्ट्रिक हॅचबॅकची किंमत 10 लाखांहून कमी आहे. 
advertisement
4/7
मारुती ऑल्टो k10 एमटी सर्वात वेगवान गाड्यांपैकी एक आहे. वजनानेही कमी असलेल्या या गाडीला प्रतितासात 0 ते 100 किलोमीटर वेग पकडायला केवळ 12.77 सेकंद लागतात.
advertisement
5/7
रेनो काइगरची टर्बो पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंट केवळ 11.01 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रतितास वेग पकडते. यात 1.0 लिटर नॅचरल एस्पिरेटेड आणि 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असतं.
advertisement
6/7
या यादीत सर्वात वरचं नाव आहे मारुती फ्राॅन्क्सचं. ही कार 10.38 सेकंदात प्रतितास 100 किलोमीटरचा वेग पकडते. यात 1 लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.2 लिटर डुअल जेट पेट्रोल इंजिन असे ऑप्शन मिळतात. यापैकी टर्बो पेट्रोल इंजिन 100 बीएचपीची जबरदस्त पॉवर जनरेट करतं.
advertisement
7/7
कार घेणं हे प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचं स्वप्न असतं. तुम्ही जेव्हा कार खरेदी कराल तेव्हा या गाड्यांचा नक्की विचार करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलाॅजी/
चित्त्यापेक्षा सुस्साट धावतात 'या' गाड्या; किंमत 10 लाखांहून कमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल