TRENDING:

स्क्रीनशॉर्ट घेताना गूगल क्रोममध्ये मिळतात भारी फीचर्स! 99% लोकांना याविषयी माहितीच नाही

Last Updated:
गुगल क्रोममधून तुम्ही स्क्रीनशॉर्टही घेऊ शकता हे खुप कमी लोकांना माहिती आहे. या ब्राउझरमध्ये अनेक असे शानदार फीचर्स मिळतात. चला याविषयी जाणून घेऊया.
advertisement
1/5
स्क्रीनशॉर्ट घेताना गूगल क्रोममध्ये मिळतात भारी फीचर्स! 99% लोकांना माहितीच नाही
दररोज अनेक लोक हे काम करताना गुगल क्रोमचा वापर करतात. गुगल क्रोमच्या वेब स्टोअरवर हजारो एक्सटेंशन्स उपलब्ध आहे. जे एक्स्ट्रा फंक्शनलिटी देतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का की, गुगल क्रोममध्ये असे काही फीचर्स आहेत. जे एक्सटेन्शन्सची गरज संपवतात. क्रोममध्ये तयार झालेले हे फीचर्स आहेत. जे एक्सटेन्शनची गरज संपवते. क्रोममध्ये तयार हे फीचर्स एक्स्ट्रा फंक्शनलिटीही देतात आणि त्यांचा वापर करणंही एकदम स्वस्त आणि सोपंआहे. चला अशाच काही फीचर्सवर एक नजर टाकूया.
advertisement
2/5
पासवर्ड मॅनेजर : आजच्या काळात एवढे अकाउंट्स झाले आहेत की, प्रत्येकाचा पासवर्ड लक्षात ठेवणं हे कठीण होतं. अशा परिस्थितीत पासवर्ड मॅनेजर तुमचं काम सोपं करेल. अनेक लोक यासाठी एक्सटेन्शन्स किंवा थर्ड-पार्टी अॅप्सचा वापर करतात. गूगल क्रोममध्ये याचा बिल्ट-इन सोल्यूशन उपलब्ध आहे. क्रोमच्या पासवर्ड मॅनेजरमध्ये क्रॉस-डिव्हाइस सिंक फंक्शनलिटीसह अनेक दमदार फीचर्स आहेत.
advertisement
3/5
स्क्रीनशॉर्ट : खुप कमी लोकांना माहिती आहे की, गुगल क्रोममधून स्क्रीनशॉर्ट घेतला जाऊ शकतो. खरंतर क्रोमची स्क्रिनशॉच फीचर डेव्हलपर टूल्समध्ये लपलेला आहे. हे वापरण्यासाठी विंडोज लॅपटॉपवर Ctrl + Shift + I प्रेस करुन डेव्हलपर टूल्स ओपन करा. नंतर Ctrl + Shift + P कमांड दिल्यावर एक कमांड मेनू ओपन होईल. यामध्ये स्क्रीनशॉर्ट टाइप करा. येथे तुम्हाला स्क्रीनशॉर्ट घेण्यासाठी अनेक ऑप्शन्स मिळतील.
advertisement
4/5
पेज ट्रान्सलेशन : ट्रान्सलेशनसाठी गूगल ट्रान्सलेट सारख्या डेडिकेटेड वेबसाइट उपलब्ध आहे. मात्र तुम्ही क्रोममध्येच पेज ट्रान्सलेट करु शकता. यासाठी टॉप राइट कॉर्नरमध्ये थ्री-डॉट मेन्यूवर क्लिक करुन ट्रान्सलेट ओपन करा. येथे तुम्हाला तुमच्या आवडीची भाषा सिलेक्ट करुन कोणत्याही पेजला ट्रान्सलेट करु शकता.
advertisement
5/5
रीडिंग लिस्ट - ब्राउझिंग करताना, तुम्हाला असे आर्टिकल दिसू शकतात जे तुम्हाला नंतर वाचण्यासाठी सेव्ह करायचे आहेत. रीडिंग लिस्ट फीचर तुम्हाला यामध्ये मदत करते. ते वापरण्यासाठी, तुम्हाला नंतर वाचायचे असलेले पृष्ठ उघडा. नंतर, थ्री-डॉट मेनूवर क्लिक करा, बुकमार्क आणि लिस्ट वर जा आणि नंतर रीडिंग लिस्ट वर क्लिक करा. असे केल्याने तुम्हाला तुमचा ओपन टॅब लिस्टमध्ये अॅडचा ऑप्शन मिळेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
स्क्रीनशॉर्ट घेताना गूगल क्रोममध्ये मिळतात भारी फीचर्स! 99% लोकांना याविषयी माहितीच नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल